लोहा l अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक माहिती विषयक कार्यशाळा उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .त्यांनी या कायद्याची सविस्तर महिती विभाग प्रमुख याना दिली.

उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार येथे कंधार व लोहा तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अट्रॉसिटी कायद्यां बाबत कार्यशाळा पार पडली. सहाय्यक परविक्षाधिन जिल्हाधिकारी तथा कंधार तहसीलदार श्रीमती अनुष्का शर्मा ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप ,कंधार गटविकास अधिकारी महेश पाटील, लोहा गटविकास अधिकारी डी के आडेराघो हे होते. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार कायदा विषयक सविस्तर मार्गदर्शन केले घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे जगातील सर्वात महान आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारित अधिनियम २०१५ – २०१६ सदर अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ च्या अंमलबजावणी संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित आले होते समाजकल्याण,आयुक्तालय पुणे याच्या १० जानेवारी २०२५ च्या परिपत्रक निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. असा कार्यशाळा विभागीय स्तरावर व जिल्हा स्तरावर होतात परंतु उपरोक्त कायद्याची व अधिनियमाची जाणीव जागृती व्हावी व जातीय सलोखा वृद्धींगत होण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

उपविभागीय अधिकारी (प्रांत) या उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा असतात. त्याच्याच अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, नायब तहसीलदार नंदकुमार भोसीकर , नायब तहसीलदार उत्तम मुदीराज, विनोद पावडे अविनाश पानपट्टे यांची उपस्थिती होती सदर प्रशिक्षणासाठी उर्मिला कुलकर्णी, हरिराम राऊत ,विलास चव्हाण ,श्रीनिवास ढगे, तुषार ढवळे, राम तांबोळी ,ज्ञानेश्वर राखे, सय्यद रिजवान, गजरवाड ,व्यंकटेश चिवडे यांनी नियोजन केले होते
