नांदेड l नऱ्हापूर येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सामाजिक कार्यात उभे आयुष्य खर्ची घालणारे गणपतराव हैबतराव झिंझाडे (जिव्हाळे) यांचे
वृद्धोपकाळात दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री दहा वाजता निधन झाले मृत्यू समयी त्याचे वय ९५ वर्ष होते. शुक्रवारी दुपारी एक वाजता त्याच्या शेतात त्याच्यावर मोठ्या जनसमुदायाचा साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांनी सात भावंडे पुतणे नातू असे कुटुंब एकत्रित ठेवले त्यांना कारभारी म्हणत त्याच्या पश्चात तीन मुली, प्रभाकर, विश्वनाथ, भास्कर ही तीन मुलगे, पाच भाऊ भावजयी, पुतणे, नातू पणतू , असा मोठा परिवार आहे माजी उपसरपंच भास्कर जिव्हाळे -झिंझाडे यांचे वडील तर माजी सरपंच उद्धव झिझाडे यांचे मोठे चुलते होते
