उस्माननगर,माणिक भिसे। जांब ते शिरूर ताजबंद रोडवरील मालवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात उस्माननगर (ता. कंधार) येथील युवकांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील जांब (बु) ते शिरूर ताजबंद या राज्य महामार्गावर घडली होती , यामुळे उस्माननगर येथे हळहळ व्यक्त होत होती . उस्माननगर येथील अफरोज पठाण वय २६ वर्ष हा कामानिमित्त सासरवडीला गेला होता. परत येताना अपघात झाल्याचे समजताच उस्माननगर सुन्न झाले होते.

जांब बु, येथील मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढे जांब येथून शिरूर ताजबंदकडे जाणारा मोठा मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच- २९, टी- १६९३) व दुचाकी (क्रमांक एमएच- २६, सीके- ०८५८) यांच्यात धडक झाली. दुचाकीस्वार अफरोज खुर्शीद पठाण (वय २५, रा. उस्माननगर) याच्या अंगावरून ट्रकचे मागचे टायर गेल्याने जागेवरच ठार झाला.

अफरोज पठाण याच्या मृतदेहावर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. शमा नूरबश यांनी रात्री १० वाजता अंत्यसंस्कार केले. अपघात झाल्यावर मुख्य रस्त्यावर एक तास वाहतूक खोळंबली होती. उस्माननगर येथील युवक असल्याचे सोशल मीडियावरून समजल्यावर वाऱ्यासारखी बातमी पसरल्याने हळहळ झाले. उस्मान नगर येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई , आजी पत्नी असा परिवार आहे.
