नांदेड| नुक्तीच जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना. अतुल मोरेश्वर सावे साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

बैठक नांदेड जिल्ह्याच्या मा.पालक मंत्र्यासह जवळ जवळ एकविस सदस्यांच्या उपस्थित संपन्न झाली.बैठक पालक मंत्री मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. बैठकीत नांदेड जिल्ह्याचे तब्बल “तिन खासदार व नऊ आमदार लोक प्रतीनिधिसह तथा बाकीचे प्रशास नातील मा.जिल्हाधिकारी साहेब आणि ईतर उच्च पदस्थ सदस्य उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याच्या 2025-2026 साठीच्या 703 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातील अनेकांना भेटून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित व इतर मागण्या संदर्भात निवेदने दिलेली असून उर्वरित प्रभूतींना आम्ही देत आहोत व देणार आहोत. कांहीजन फोन उचलत नाहित व नंतरही करत नाहित! कांही जनांना दोन दोन वेळा निवेदने देऊन व सभागृहात बोलतो म्हणूनही गेल्या सात वर्षात त्यांनी सभागृहात एकदाही तोंडं उघडली नाहित.

खरं तर वरिल सर्वांनाच ज्या आई-वडीलांनी जन्म दिलेला आहे ती आता “ज्येष्ठ आई-वडिल झालेली असावित”! किमान त्यांची आठवण करून त्यांच्या सारख्या “ज्येष्ठ आई-बाबां नागरिकांच्या साठी” एकाही सुज्ञ,सुसंस्कारित महाभागानी विशेष निधीसाठी मागनी व तरतूद करण्याची अपेहा असूनही मागनी केल्याचे वाचण्यात आले नाही.

केंद्र शासनाच्या अर्थ संकल्पातही “ज्येष्ठ माय-बाप नागरिक समूहा साठी” खास अर्थिक तरतूद केलेली दिसत नाही. त्या काही दिवसात राज्य शासनाचाही अर्थ संकल्प जाहिर सादर केला जाईल.किमान महाराष्ट्र शासनाने तरी ज्येष्ठांसाठी मोठी तरतूद करावी असी मागनी डाॅ.हंसराज वैद्य यांनी केली आहे. ते म्हणाले की भारतात ज्येष्ठ नागरिक होणेंच (ज्येष्ठ माय बाप होणेंच) गुन्हा आहे काय?