नवीन नांदेड l मोजे असरजन येथे 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, गाथा पारायण श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती व कळशारोहण सोहळ्याचे, लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे7 फेब्रुवारी रोजी हभप राम महाराज सुगावकर यांच्ये किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

सर्व भावीक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, मौजे असर्जन ता. जि. नांदेड येथे श्री विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापण सोहळा व श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्या निमित्त गुरुवर्य आनंदगीर महाराज, कै.आनंद भारती महाराज असर्जनकर, के.भगवान महाराज असर्जनकर,गुरुवर्य दत्तगीर महाराज मठसंस्थान असर्जन, श्री. ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कृपाशिर्वादाने संपन्न होत आहे.

31 जानेवारी दुपारी भागवत कथेता सुरुवात होणार भागवताचाय हभप पुनम दिदी गिरी आळंदीकर यांच्या समुधर वाणीतून दुपारी 12 ते 4 असुन 4ते 6
भावार्थ रामायण आयोजित करण्यात आले
आहे.

श्री गाथा पारायण व्यासपीठ नेतृत्व श्री ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर , हभप गंगाधर महाराज बोराळकर,हभप परमेश्वर महाराज कंधारकर,हभप वैष्णवी ताई गौड सोनखेडकर,हभप राम महाराज सुगावकर, हभप राधाताई पांचाळ आव्हाईकर, यांच्ये किर्तन लक्ष्मण शक्ती सोहळ्यास सुरूवात,7 फेब्रुवारी रोजी हभप आनंदराव पाटील वळशिंगे हरबळकर यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताह मध्ये दैनंदिन कार्याक्रम पहाटे काकडा भजन, सकाळी गात राम भारती महाराज मोहनपुरा व संत दतागिर महाराज असरजनकर ,संत समगिर महाराज उपस्थित राहणार आहेत. या सप्ताहयाला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी, असर्जन, ता.जि.नांदेड व्यवस्थापक वीर शिवबा नवयुवक मित्रमंडळ, असर्जन, ता. जि. नांदेड यांनी केले आहे.