Sub Divisional Officer Sangewar ; अट्रॉसिटी कायद्यांच्या माहितीसाठी कार्यशाळा संपन्न
लोहा l अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक माहिती विषयक कार्यशाळा उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .त्यांनी या कायद्याची सविस्तर महिती विभाग प्रमुख याना दिली.
उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार येथे कंधार व लोहा तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अट्रॉसिटी कायद्यां बाबत कार्यशाळा पार पडली. सहाय्यक परविक्षाधिन जिल्हाधिकारी तथा कंधार तहसीलदार श्रीमती अनुष्का शर्मा ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप ,कंधार गटविकास अधिकारी महेश पाटील, लोहा गटविकास अधिकारी डी के आडेराघो हे होते. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार कायदा विषयक सविस्तर मार्गदर्शन केले घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे जगातील सर्वात महान आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्या...
