Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Police Patil : नांदेड येथे पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळा संपन्न

Police Patil : नांदेड येथे पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळा संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| दिनांक 11 रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात आले . या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक सुरेश गुरव, श्री धरणे व इतर महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी जील्ह्यातील जिरोणा येथील पोलीस पाटील ज्योती प्रमेश्वर पवार (मिराशे) यांच्यासह विविध पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला. सकाळी सात ते अकरा क्रिकेट सामने 11 ते 2 मान्यवरांचा सत्कार व लगेच माननीय न्यायाधीश मॅडम यांचे पोलीस पाटलांसाठी कायदेविषयक शिबिर मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सोहळा व 2 वाजता स्नेह भोजन झाले. त्यानंतर महिलांचे खेळ संगीत खुर्ची व तळ्यात मळ्यात असे इत्यादी खेळ संपन्न झाले. 3:30 वाजता फायनल क्रिकेटचा सामना भोकर डिव्हिजन विरुद्ध एस पि लेव्हल संघ असा झाला. जिल्ह्यातील सर्व पोली...
Chief Executive Officer Meenal Karanwal : जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम

Chief Executive Officer Meenal Karanwal : जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या जागेत असलेल्या शाळांची अधिकृत नोंद नमुना नंबर 8 व सातबारा उताऱ्यावर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात असून, या प्रक्रियेसाठी गुगल शिटच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 864 शाळांची माहिती संकलित करण्यात आली असून उर्वरित शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 193 जिल्हा परिषद शाळा स्‍वत:च्‍या मालकीच्‍या आहेत. त्या सर्वांच्या मालकी हक्काच्या नोंदी शासन दरबारी होण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन बैठका मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये घेण्‍यात आल्‍या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त...
Nirmanth Nursing College ; निर्मिती नर्सिंग कॉलेजतर्फे रंगपंचमीची जनजागृती

Nirmanth Nursing College ; निर्मिती नर्सिंग कॉलेजतर्फे रंगपंचमीची जनजागृती

नांदेड, करियर
नांदेड l मुक्ता साळवे बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित निर्मिती नर्सिंग कॉलेजतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच विविध वनस्पतीचे पाने आणि फुलांपासून ज्यामध्ये पळस, जास्वंद, पालक, बीटरूट, हळद, कोथिंबीर आणि मेहंदी इत्यादी वनस्पतीचा वापर करत विविध नैसर्गिक रंग तयार केले. त्याच बरोबर सर्वांनी या रंगपंचमीला नैसर्गिक रंगाचा वापर करण्याची तसेच इतरांना देखील नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि नैसर्गिक रंग बनवणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक केले. याप्रसंगी निर्मिती नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकांनी तसेच विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची भूमिका स्पष्ट केली आणि सर्वांनी पर्यावरपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी असे आवाहन केले. ...
The problems of women : शहर आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या भिन्न आहेत- मुंडकर

The problems of women : शहर आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या भिन्न आहेत- मुंडकर

करियर, नांदेड
नांदेड| महिलांच्या असमानतेचा विषय ठराविक जाती धर्मात नव्हे तर सर्वच जाती धर्मात कमी अधिक प्रमाणात आहे. वार्धक्यातील महिलांच्या आणि खास करून ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या या शहरी भागातील महिलांच्या समस्या पेक्षा अधिक आणि भिन्न आहेत. असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे अभ्यासक श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते गोदावरी असोसिएशन, नांदेड यांच्या वतीने आयोजित महिला जलतरणपटू पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, डॉक्टर संदीप आढाव, दिलीप दमकोंडवार, यांची विशेष उपस्थिती होती. श्री मुंडकर पुढे म्हणाले की, महिलाही बाल्यावस्थेत असताना वडिलांच्या, युवा अवस्थेत पतीच्या आणि वार्धक्याच्या अवस्थेत मुलाच्या धाकाखाली असतानाचे चित्र दिसून येते. शहरात याचे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. अशा कार्यक्रमामुळे मानसिकता बदलून ...
S.R.T.M. University ; विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन

S.R.T.M. University ; विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन

करियर, नांदेड
नांदेड l विद्यापीठातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत प्राधिकरण बैठकीत विविध प्रस्ताव व प्रश्न विचारून त्यावर कारवाई करावी यासाठी सिनेट सदस्य डॉ. महेश मगर यांच्याकडून विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांसदर्भात ई मेल व्दारे निवेदन देण्यात आले होते परंतु विद्यापीठाच्या प्रशासनाकडून काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही व प्राधिकरण बैठकीत झालेल्या ठराव आणि निर्णयावर कार्यवाही विहित कालावधीत करण्यात आली नाही. तसेच नियमबाह्य कामे करण्यात येत होती त्याची चौकशी करण्यासाठी पत्र दिले होते. परंतु सदर पत्रावरही कारवाई करण्यात आली नाही आणि विविध मागण्या बाबत विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न सोडवावेत या मागणीसाठी आज बुधवार दि.१२ मार्च रोजी सकाळी १0 वाजता स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्य...
Zilla Parishad ; जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

Zilla Parishad ; जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

नांदेड, करियर
नांदेड l गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरिक आपली कामे व तक्रारी घेऊन जिल्हा परिषदेत येत असतात. त्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांच्या निर्देशानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेशही यापूर्वीच मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांदी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्‍या दालना नजीक अभ्यागतांसाठी विशेष दालन उपलब्ध असून येथे बसण्याची सुविधा तसेच वृत्तपत्रे वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अभ्‍यागतांसाठी पिण्याच्या पाण्याच...
Kiramgaon Zilla Parishad : किरमगाव जिल्हा परीषदेच्या सरांनी शाळेला दांडी मारली; विद्यार्थी घरी परत गेले

Kiramgaon Zilla Parishad : किरमगाव जिल्हा परीषदेच्या सरांनी शाळेला दांडी मारली; विद्यार्थी घरी परत गेले

करियर, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील दुर्गम गावापैकी असलेल्या किरमगाव येथिल जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षकांनी दि. ६ गुरूवारी शाळेला दांडी मारून दिवसभर शाळा बंद ठेवली, ऐनकेन कारणाने शाळा बंद राहत असल्याने पालकांत कमालीची नाराजी आहे. परिणामी विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ आय वरून अगदी दोन किलोमीटर अंतरावर वाघी ग्रामपंचाय हद्दीत किरमगाव आहे, रस्ताही बऱ्यापैकी आहे, येथे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परीषदेची शाळा आहे, मात्र येथिल शाळेचे शिक्षक गाव आडपेटेला आहे, कोणी अधिकारी फिरकत नाही अगदी हेच हेरून मिटींग आहे, टपाल पोचवायच आहे, पत्र द्यायच आहे अशी वेगवेगळी कारणे दाखवत शाळेला दांडी मारतात, कधी दुपारीच गायब होतात. हे प्रकार नेहमी एैकायला मिळत असल्याच पालक सांगतात. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची भिती लक्षात घेता शिक्षण विभागाने आता शाळा अर्धवेळेवर आनल्यात हि त्यांच्यासाठी जम...
Mla. Hemant Patil : अंध सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींना आमदार निधीतून देणार लॅपटॉप : आ. हेमंत पाटील

Mla. Hemant Patil : अंध सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींना आमदार निधीतून देणार लॅपटॉप : आ. हेमंत पाटील

करियर, नांदेड
नांदेड| बियाँड़ व्हिजन फाउंडेशन संस्थेने समदृष्टी प्रतिष्ठान मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने श्री गोविंदसिंघजी स्टेडिअम नांदेड येथे आज दिव्यांग महिला कला क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना दिल्या. दिव्यांग व्यक्तीचे स्वाभिमानाने जीवन जगण्याचे त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर परिसरातील द्वाटरी दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे (लॅपटॉप) उपलब्ध करून देण्यासाठी 20 लाख रूपये आर्थिक सहाय्य देणार असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी घोषीत केले. जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधुन क्रीडा संकुल परिसर नांदेड येथे या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून 150 हुन अधिक दृष्टीहीन दिव्यांग महिला सह...
District Collector ; जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबित

District Collector ; जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबित

नांदेड, करियर
नांदेड l जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुटूंर तांडा येथील गैरव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत पोलिसांना केंद्राच्या आसपास असणाऱ्या काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तर गोंधळाला नियंत्रीत न करू शकल्याबद्दल केंद्र संचालक व कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. यासोबतच परीक्षा केंद्रावरील गर्दी पाहून तिव्र शब्दात केंद्र संचालक व पोलीस यंत्रणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. याठिकाणच्या केंद्रचालकांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. तर या परिसरातील जबाबदारी असणाऱ्या बैठेपथकातील सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रसंचालकास बदलविण्यात आले असून या परीक्षा केंद्राचा प्रभार दुसऱ्य...
future ; भविष्यातील पिढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे आवश्यक – प्रा. डॉ. शिवाजी भदरगे

future ; भविष्यातील पिढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे आवश्यक – प्रा. डॉ. शिवाजी भदरगे

नांदेड, करियर
नांदेड l प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षण अभियान योजनेअंतर्गत श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी सामग्री लेखन’ या अण्ड-ऑन कोर्सच्या अंतर्गत "हिंदी में कृत्रिम बुद्धिमत्ता लेखन सामग्रीचा उपयोग" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील हिंदी विषयाचे प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) चे विविध पैलू स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व वेगाने वाढत आहे. आणि ए. आय. मुळे विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडत आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उ...
error: Content is protected !!