नांदेड| पिपल्स हायस्कूल नांदेडला शिकलेल्या व १९७७ साली दहावीची परीक्षा दिलेल्या, आज साठ पासष्ट वयोगटातील चीरतरुणांचा स्नेहमेळावा कपिला रिसॉर्ट, पुणे येथे नुकताच संपन्न झाला.


या स्नेहमेळाव्यात सर्वश्री डॉ. दीपक मांडाखळीकर नांदेड, श्री.अनिल महामुनी पुणे, सौ.स्मिता बोकिल पुणे, श्री.प्रमोद डुब्बेवार मुंबई, सौ.कल्पना व्यहाळकर पुणे, श्री.श्रीकांत अकोलकर नांदेड, श्री.विजय वाघ मुंबई, श्री.अविनाश जोशी पुणे, श्री.अमोल कुलकर्णी अहिल्यानगर, श्री.संभाजी कुबडे पुणे, श्री.शिरिष दडके नाशिक, सौ.प्रमोदिनी येरमाळकर पुणे, श्री.अनिल अमृतवार नांदेड, श्री.विलास देशमुख पुणे, सौ.शकुंतला मोकले नांदेड, श्री.वेंकटेश कवटीकवार पुणे, सौ.निशा कापसे मुंबई, श्री.प्रशांत खरवडकर संभाजीनगर, सौ.प्राजक्ता बर्वे पुणे, सौ.स्वाती पटवर्धंन पुणे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.


सौ.ज्योत्स्ना डुब्बेवार, सौ.गंगामणी अमृतवार, सौ.अरुणा महामुनी, सौ.रागिनी कुबडे या माजी विद्यार्थ्यांच्या अर्धांगिनी देखील उपस्थित होत्या. पिपल्स हायस्कूल नांदेड १९७७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहमिलन पिपल्स हायस्कूल, नांदेडला २६ नोव्हेबंर २०१७ ला संपन्न झाले. दूसरे स्नेहमिलन बजाज रेसीडेंसी, नांदेडला २५ नोव्हेबंर २०१८ ला संपन्न झाले.


तीसरे स्नेहमिलन नाशिकला १७ व १८ नोव्हेबंर २०१९ ला संपन्न झाले. चौथे स्नेहमिलन संभाजीनगरला ठिकाणी ४ व ५ डिसेम्बर २०२१ ला संपन्न झाले. पाचवे स्नेहमिलन जांभुळ बेट नांदेडला २८ व २९ जानेवारी २०२३ ला संपन्न झाले. सहावे स्नेहमिलन रिपल्स रिसॉर्ट पुण्याला २०२४ ला संपन्न झाले व सातवे स्नेहमिलन पुन्हा पुण्यात कपिला रिसॉर्ट येथे १ व २ फेब्रुवारी २०२५ ला संपन्न झाले.असे श्री.अनिल अमृतवार यांनी सांगितले.




