HomeकरियरChandraprakash Deglurkar : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय...

Chandraprakash Deglurkar : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

आदिलाबाद/नांदेड| ‘अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद’ या अराजकीय सामाजिक संघटनेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना आदिलाबाद (तेलंगणा) येथील गुरु रविदास समाज सेवामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

गुरु रविदासांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर आदिलाबाद येथे राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल – २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्यात प्रथमच यावर्षीपासून राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. यावेळेस “रविदासीया आंबेडकरी कविसंमेलन” ही आयोजित करण्यात आले आहे.

गुरु रविदास अभिवादन यात्रेच्या माध्यमातून आदिलाबाद व तेलंगणा परिसरात सर्वप्रथम गुरु रविदासांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करणारे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची यावर्षीच्या पहिल्या मानाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे परिवर्तनवादी विचारांचे निष्ठावान सामाजिक नेते, साहित्यिक, लेखक, पत्रकार व परखड व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. रघुनाथ ईटकरे, दादाराव कदम, डाॅ. अलका गव्हाळे, सुकुमार पेटकुले यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे या फेस्टिव्हलचे अध्यक्ष कवी मधू बावलकर यांनी कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments