नांदेड| जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसापासून अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्या माफियांच्या विरोधात मोहीम चालविली जात आहे. त्या अनुषंगाने अवैद्य वाळु उपसा उपसा करणाऱ्या घाटावर कारवाई करुन 57 लक्ष 20 हजार रुपये किंमतीची रेती, रेती उपसा करण्याचे साहीत्य ताब्यात घेण्यात आले आहे.


नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन अवैद्य मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अबिनाशकुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य वाळू उपसा व वाहतुक संदर्भाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 04 वाजेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचे पथक व नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी अवैद्य वाळू उपसा घाटावर छापा टाकला.

या ठिकाणी अवैद्य वाळू उपसा घाट मौजे विष्णुपुरी शिवारात गोदावरी नदीच्या काठावर आणि मौ. कल्हाळ गावाचे शेतशिवारात गोदावरी नदी पात्रातुन अवैद्य वाळु उपसा करणारे असे दोन ठिकाणावर दोन छापा टाकून कार्यवाही केली. या कार्यवाहीत सदर ठिकाणाहुन दोन लोखंडी बोटी 20,00,000, दोन लोखंडी बोटीज्यात इंजीन लावलेले 5,00,000 105 ब्रास रेती 5,25,000 एक जेसीबी मशीन किं 20,00,000 तीन लोखंडी क्रेन 1,50,000 पाच लोखंडी पाईप 20,00015 तराफे 5,25,000 (जागीच नष्ट) करण्यात आले असून, एकुण 57,20,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर ठिकाणी महसुलचे अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेऊन पंचणामे करण्यात आले आहेत. सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, नांदेड ग्रामीणचे बिट सपोउपनि माधव विठ्ठल गवळी यांचे फिर्यादवरुन नांदेड ग्रामीण येथे आरोपी 1) चंद्रा गोविंद सिरसागर (2) भानुदास यशवंत सिरसागर 3) मन्टेसिंग सर्व रा. कल्हाळ ता.जि. नांदेड 4) शेख मेहेराजोद्दीन शेख निजामोद्दीन रा. विष्णुपुरी नांदेड ता.जि. नांदेड यांचेविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि गढवे व पोउपनि चव्हाण नांदेड ग्रामीण हे करित आहेत.

हि कार्यवाही अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश मांटे.पो.स्टे. नांदेड ग्रा., पोउपनि साईनाथ पुयड व सोबत पोकॉ. बालाजी कदम, पोकों. विलास कदम, पाकॉ. संदीप घोगरे, पोकॉ. घेवारे, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील बिट क्र.05 चे बिट अंमलदार सपोउपनि माधव गवळी तसेच पोलीस अंमलदार पोहेकॉ ज्ञानेश्वर तिडके यांनी हि छापा कार्यवाही यशस्वी केली आहे.