हिमायतनगर l तालुक्यातील टेंभुर्णी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेंभुर्णी गावच्या सरपंच सौ यशोदाताई प्रल्हादराव पाटील तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.बापूरावजी रामराव माने,सेवानिवृत्त शिक्षक श्री.मारोतराव माने,श्री. सुरेशराव भीमराव पाटील,श्री.तातेरावजी तवर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभुर्णी येथील कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सदस्या, शालेय व्यवस्थापन समितीची 2011 पासून चे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्राथमिक शाळा वाघीचे मु. अ. श्री अमोल गेडेवाड सर, प्रा.शा.विरसनी येथील संजय कंधारे सर, परमेश्वर माध्यमिक विद्यालयाचे नरेश गंगासागरे सर, राजेमोड सर.

जि प के प्रा शा सरसम येथील मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री.गणेशजी कोकुलवार सर आणि हुतात्मा जयंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे श्री.सुनिल सुवर्णकार सर, श्री.राजेश कागणे सर, श्री.रामदास केंद्रे सर, श्री.प्रमोद मुक्कावार सर, प्रा.शा. सवना येथील श्री.सतीश गोपतवाड सर,प्रा.शा.पार्डीचे बसापुरे सर प्रा.शा. शेलोडा येथील वडवळे सर, प्रा.शा. दगडवाडी येथील आष्टुरे सर,प्रा. शा. पळसपूर येथील शा.व्य. समिती अध्यक्ष दिगंबराव वानखडे पाटील तथा शिक्षक श्री. संतोष मठवाले सर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील माता-पालक, बंधू- भगिनी तथा सर्व प्रतिष्ठित व्यक्तीनी गर्दी केली होती. चिमुकल्यांची नृत्य नाट्य पाहून पालकवर्गाने व गावाकर्यांनी आनंद व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनंता लहाने सर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रामेश्वर रघुनाथ माने, शा. पो. आहारचे पांडुरंग रामराव कदम, अंगणवाडी ताई आशाताई शंकर हनवते व लक्ष्मीबाई दंतलवाड, उपाध्यक्ष राजाराम मुळे महाराज, फोटोग्राफर शुभम दाडेराव अरविंद पवार, सुनील कदम, ज्ञानेश्वर माने, विकास देवसरकर, कृष्णा कदम, दिनेश माने, निलेश कदम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आर्तिका मारोतराव माने हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अनंता लहाने सर यांनी केले.