हदगाव l हदगाव तालुक्यातील हरडफ येथे महाप्रजापती धम्म किर्ती महिला मंडळ व नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या धम्म मेळाव्याची संयोजन समिती गठीत करण्यात आली असून यासाठी धम्म ज्योती बुद्ध विहार हरडफ येथे मिटिंग घेऊन सर्वानुमते बिनविरोध संयोजन समितीची निवड करण्यात आली.


या समितीमध्ये अध्यक्ष विक्रात वाठोरे, उपाध्यक्ष संदिप रायघोळ, सचिव कपिल वायवळ, कोषाध्यक्ष सिध्दार्थ वाठोरे पत्रकार, माधव आढागळे, सहसचिव शेषेराव वाठोरे, नितेश वाठोरे तर सदस्य म्हणून प्रताप वाठोरे, प्रवेश वाठोरे, रविरज वाठोरे, सिद्धार्थ वाठोरे, आदींची निवड करण्यात आली.

हरडफ येथे गेल्या ५१ वर्षापासून धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते तालुक्यात नव्हे तर संबंध जिल्ह्यातील व परिसरातील सर्वात पहिला धम्म मेळावा प्रसिद्ध आहे. या मेळाव्यास राज्यातील व परराज्यातील उपासक उपस्थित राहतात. त्यामुळे एक महिन्यापासून मेळाव्याची तयारी केली जाते.

जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला धम्म मेळावा हरडफ या गावांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा -केला जातो यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्रामध्ये पंचशील ध्वजारोहण सकाळी ९ वाजता धम्म किर्ती महिला मंडळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता धम्मदेशना उपासक आर. व्ही. वाठोरे, गणपत वाठोरे, यांची धम्मदेशना होणार आहे.

द्वितीय सत्रात दुपारी साडेबारा वाजता गावातील प्रमुख रस्त्याने तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रबोधन पर्वामध्ये वक्ते म्हणून प्रा.डॉ. पंजाबराव शेरे व संगीताताई कासारे यांचे व्याखान होणार आहे. रात्री ९ वाजता तिसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक युवा विद्रोही प्रबोधनकार सुरज अतिष संच मुंबई, सुप्रसिद्ध गायिका निशा धोंगडे संच चंद्रपूर यांचा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील सर्व जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समिती धम्म किर्ती महिला मंडळ व नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.