HomeनांदेडDhananjay Madewar ; नांदेड दक्षिण तालुका पद्मशाली अध्यक्ष युवक संघटना अध्यक्षपदी धनंजय...

Dhananjay Madewar ; नांदेड दक्षिण तालुका पद्मशाली अध्यक्ष युवक संघटना अध्यक्षपदी धनंजय माडेवार

नांदेड l पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षि मार्कण्डेय पुत्र भावना ऋषी व भद्रावती देवी यांचा कल्याण विवाहोत्सव सोहळा मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २५ रोजी सायं. ६.०० वाजता श्री महर्षि माकण्डेय मंदिर, शनीदेवगल्ली, चौफाळ, नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात अखिल भारत पद्मशाली संघम्, हैद्राबाद संलग्नीत, मराठवाडा पद्मशाली महासभा, नांदेड अंतर्गत होवू घातलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. नांदेड (दक्षिण) तालुका पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी धनंजय माडेवार यांची बिनविरोध निवड झाली.

त्या अनुषंगाने नांदेड (दक्षिण) तालुका पद्मशाली युवक संघटना नवनियुक्त पदाधिकारी यांना पद नियुक्ती पत्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारत पद्मशाली संघम्चे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारत पद्मशाली संघम्चे उपाध्यक्ष, प्रल्हादराव सुरकूटवार,अखिल भारतीय वैवाहिक संघम्,हैद्राबादचे अध्यक्ष सतिषसेठ राखेवार, मार्कण्डेय बँकचे चेअरमन श्री अशोक श्रीमनवार, मराठवाडा पद्मशाली महासभेचे माजी अध्यक्ष, गणेशरावजी गुंडेवार.

मराठवाडा पद्मशाली युवक संघटचे अध्यक्ष तथा समाजभुषण गोविंदसेठ कोकुल‌वार, अखिल भारत पद्मशाली महिला संघमचे अध्यक्षा,सौ. कविता ताई गड्डम,तालुका महिला अध्यक्षा,सौ.लक्ष्मीबाई अंकमवार, तालुका प्रौढ संघटनेचे अध्यक्ष श्री शिवशंकर सिरमेवार,नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेचे कार्याध्यक्ष, भारत गड्डेवार,पद्मशाली समाज चौफाळा भागातील चौधरी,मनोहर चलिंद्रवार,अंकुश गोणे, मधुकर पुर्णेकर,व्यंकटेश माडेवार, कृष्णाजी हंसनपल्ली इत्यांदी मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देवून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे पंकज जिंदम, नरेश चलिंद्रवार, गणेश श्रीरामवार,अनिल गुडेवार,श्रीनिवास दासरवार,विजय बोगेवार, गंगाप्रसाद पुर्णेकर,अरविंद जिंदम,राजकुमार पोलसवार, कृष्णा कोकुलवार, महेंद्र हंसनपल्ली, बजरंग नागुल,संतोष चरपिलवार, लक्ष्मीकांत यम्मलवार, राहूल चलिंद्रवार, संदीप यलगंदलवार, महेश येमेवार, मनिष सुरकूटवार, गणेश मार्कण्डेय, दत्ता रामदिनवार इ. युवा कार्यकर्त्यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात गौरवाध्यक्ष श्रीधर सुंकरवार यांनी नांदेड (दक्षिण) तालुका युवक संघटनेचे पदाधिकारी व तालुकाध्यक्ष श्री धनजंय माडेवार यांना शुभेच्छा दिल्या व पुढील सामाजिक कार्यात हिरहीरीने भाग घेवून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकर घ्यावा व सर्व समाज बांधवांना एकत्र करुन सामाजासाठी कांही विधायक कार्य करावे असे सुचविले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री संग्रामजी निलपत्रेवार यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments