Dhananjay Madewar ; नांदेड दक्षिण तालुका पद्मशाली अध्यक्ष युवक संघटना अध्यक्षपदी धनंजय माडेवार
नांदेड l पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षि मार्कण्डेय पुत्र भावना ऋषी व भद्रावती देवी यांचा कल्याण विवाहोत्सव सोहळा मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २५ रोजी सायं. ६.०० वाजता श्री महर्षि माकण्डेय मंदिर, शनीदेवगल्ली, चौफाळ, नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात अखिल भारत पद्मशाली संघम्, हैद्राबाद संलग्नीत, मराठवाडा पद्मशाली महासभा, नांदेड अंतर्गत होवू घातलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. नांदेड (दक्षिण) तालुका पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी धनंजय माडेवार यांची बिनविरोध निवड झाली.
त्या अनुषंगाने नांदेड (दक्षिण) तालुका पद्मशाली युवक संघटना नवनियुक्त पदाधिकारी यांना पद नियुक्ती पत्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारत पद्मशाली संघम्चे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखि...
