नवीन नांदेड l सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड 2025 चा अध्यक्षपदी त्र्यंबक कदम तर सचिवपदी साहेबराव गाढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


सार्वजनिक शिवजन्मोत्सवाची बैठक 3 फेब्रुवारी रोजी सिडको येथील जिजाऊ सृष्टी येथे संपन्न झाली, यावेळी बैठकीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील घोगरे,दिगांबर शिंदे,ऊतम जाधव, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे,सोपानराव पांडे,संकेत पाटील,सतिश बस्वदे,दिलिपराव कदम भगवानराव ताटे यांच्या सह विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, नागरिक उपस्थिती होती.

सर्वानुमते शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी त्र्यंबक कदम सचिवपदी साहेबराव, कोषाध्यक्ष वसंतराव कदम, उपाध्यक्षपदी रघुनाथ ताटे, ताटे, मधुकर गायकवाड, कोषाध्यक्ष वसंतराव कदम, सहसचिव विनोद वंजारी,दिपकभरड, सह कोषाध्यक्ष ऊतमराव जाधव,संघटक नामदेव चव्हाण, सदस्य ब्रम्हाजी वडजे,अशोक कदम, बालाजी हिवराळे,प्रमोद गाडेकर,संदिप कदम ,गोविंदराव मजरे, शेख मोईन लाटकर,कोंडीबा घोरबांड, एकनाथ पाटील, सुभाष सुर्यवंशी, यांच्यी निवड करण्यात आली,सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
