Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Sandeep Ushkewar ; संदीप उश्केवार यांना पिएचडी प्रदान

Sandeep Ushkewar ; संदीप उश्केवार यांना पिएचडी प्रदान

नांदेड, करियर
नांदेड l येथील संदीप सुनील उश्केवार यांनी रसायन तंत्रज्ञान संस्था मांटुगा मुंबई या नामांकित विद्यापीठातून अॅडव्हॉन्सड् ईन रिन्युअबल एनर्जी या विषयात संसोधन करून पिएचडी प्राप्त केली आहे.ते माजी शिक्षणाधिकारी कै. टी. बुचन्ना यांचे नातु आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे काका प्रा. विजय उश्केवार व काकू डॉ. सुपर्णा सुवर्णकार यांना देतात. त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे मित्र लक्ष्मण भंडारे, डॉ.किरण झडते आणि सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे…...
Maharashtra Scholarship Exam Final Answer Key Announced : महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

Maharashtra Scholarship Exam Final Answer Key Announced : महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी दि. ४ मार्च २०२५ रोजी अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात आली होती. या उत्तरसूचीवर विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषयतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत. अंतिम उत्तरसूची ही अंतिमच राहणार - शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी स्पष्ट केले आहे की, अंतिम उत्तरसूची ही अंतिम समजली जाणार असून, या संदर्भात कोणत्याही प्रकारची निवेदने किंवा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारेच निकाल तयार केला जाईल. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी https://puppssmsce.in व https://www...
Group Education Officer ; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी गटशिक्षणाधिकारी फोले यांचे योगदान महत्त्वपूर्ण – डॉ. राम वाघमारे -NNL

Group Education Officer ; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी गटशिक्षणाधिकारी फोले यांचे योगदान महत्त्वपूर्ण – डॉ. राम वाघमारे -NNL

नांदेड, करियर
नांदेड। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह त्यांना सृजनशील बनवण्यासाठी हादगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांची मेहनत व प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने आज नांदेड येथे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, सचिव दत्ताहरी धोत्रे, बाबुराव कसबे, संजय नरवाडे, मिलिंद चावरे, अशोक दामोदर, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फोले यांनी हादगाव तालुक्यात विविध उपक्रम राबवले आहेत. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनांमध्ये हादगाव तालुक्यातील शाळा नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. रिक्त पदांची समस्या असूनही गुणवत्तेवर भर सत्काराला उत...
CET/NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवासेनेतर्फे मॉक टेस्टचे आयोजन

CET/NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवासेनेतर्फे मॉक टेस्टचे आयोजन

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| CET आणि NEET परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवासेनेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा सराव आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॉक टेस्ट विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये वेळेचे नियोजन, प्रश्न सोडवण्याची पद्धत, आणि अभ्यासाचे मूल्यमापन यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.युवासेना नेते आदित्य ठाकरे तसेच खा.नागेश पाटील आष्टीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचा शहरी भागासह ग्रामिण भागातील विद्यार्थ्याना फायदा झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून युवासेना जिल्हाप्रमुख अॅड.यश खराटे यांनी हा उपक्रम तिर्थक्षेञ असलेल्या माहूरगडच्या मौजे.अंजनखेड येथील साविञीबाई फुले माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच हदगांव ये...
Assistant Commissioner Anket Jadhav : आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर यूपीएससीचे शिखर सहज पार करता येते – सहाय्यक आयुक्त अंकेत जाधव

Assistant Commissioner Anket Jadhav : आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर यूपीएससीचे शिखर सहज पार करता येते – सहाय्यक आयुक्त अंकेत जाधव

नांदेड, करियर
नांदेड| मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त, (भारतीय महसूल सेवा.) अंकेत जाधव यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर यूपीएससी परीक्षेचे शिखर सहज पार करता येते असे सांगितले. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही गोष्ट अवघड नसते ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी सकारात्मक पद्धतीने अभ्यास करावा तसेच या मार्गदर्शनात त्यांनी त्यांच्या यशाची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याविषयी आपले मत मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि करिअरच्या स...
Ravi Dhage selected : उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांची आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Ravi Dhage selected : उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांची आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड

करियर, नांदेड
नांदेड| शिक्षण क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांना नवे दृष्टीकोन देणारे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा तालुका लोहा येथील मुख्याध्यापक तथा उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांची महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत सिंगापूर आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे. कोरोना काळात घरचा अभ्यास हा स्तुत्य उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. तसेच, शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक म्हणून भरीव योगदान दिले. तंबाखू मुक्त शाळा अभियानात त्यांनी शाळा व कुटुंबांमध्ये जागरूकता निर्माण करून सकारात्मक बदल घडवला. विद्यार्थ्यांसाठी भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने लर्निंग टू लर्न उपक्रमाअंतर्गत त्यांनी जपानी व...
MGM College : एम.जी.एम.काॅलेजच्या ‘नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट काॅम्पीटिशन’ मध्ये सचिन गायकवाड व श्रीराम भांजे यांना पुरस्कार

MGM College : एम.जी.एम.काॅलेजच्या ‘नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट काॅम्पीटिशन’ मध्ये सचिन गायकवाड व श्रीराम भांजे यांना पुरस्कार

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड येथील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) काॅलेज आॅफ काॅम्पुटर सायन्स अँड आय.टी.महाविद्यालयामार्फत १८ मार्च २०२५ मंगळवार रोजी घेण्यात आलेल्या 'नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट काॅम्पीटिशन' मध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये लाईफ सायन्स आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयावर आधारित विषयावर विविध प्रोजेक्ट सादर करण्याची स्पर्धा महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये महाविद्यालयातील एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी या वर्गातील विद्यार्थी सचिन बाजीराव गायकवाड व श्रीराम उत्तमराव भांजे या दोन विद्यार्थ्यांनी 'इको-फ्रेंडली सिन्थेसीस आॅफ नॅनो-फर्टिलायझर' या विषयावर आधारित प्रोजेक्ट सादर केला होता व त्यावर उत्कृष्ट प्रदर्शन देले.त्यामुळे महाविद्यालयामार्फत त्यांचा तृतीय क्रमांक काढण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम...
After 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव !

After 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव !

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात. कालांतराने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा धराव्या लागतात आणि आपले आवडते शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर जावे लागते. पुन्हा कधीतरी ते शिक्षक, मित्र, मैत्रिणी भेटतील की नाही, याची शाश्वती पण नसतेः मात्र माहूर शहरातील श्री जगदंबा हायस्कूल च्या शाळेत १९९६/९७ मध्ये दहावीत शिकणाऱ्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल २७ वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली आणि या अविस्मरणीय आणि भावनिकक्षणांचे साक्षीदार झालेत. माहूर येथील कपिलेश्वर धर्म शाळेच्या सभागृहात दि १५ मार्च रोजी या अनोख्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त प्राचार्य मराठीचे शिक्षक अरूण कोरटकर. यांनी या स्नेहसंमेलनाचे यथोचित उ‌द्घाटन केले.यावेळी बाबा गोडसे सर...
Cyprus students score hat-trick : सायप्रसच्या विद्यार्थ्यांनी श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मारली हैट्रिक

Cyprus students score hat-trick : सायप्रसच्या विद्यार्थ्यांनी श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मारली हैट्रिक

करियर, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाशिवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सायप्रस इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण करून सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक जिंकून हैट्रिक मारली आहे. प्रेक्षकांच्या व समिक्षकांच्या पसंतीस दोन्ही गीतांवरील नृत्य उतरले असल्याने त्यांना प्रथम क्रमांकांचे बक्षीस देण्यात आले. श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमेटीच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच श्री परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील १३ शाळांनी सहभाग नोंदविला होता. या महत्वपूर्ण स्पर्धेत हिमायतनगर येथील दिपनगर खडकी बा. येथे असलेल्या सायप्रस इंग्लिश मेडियम स्कूलच्या इयत्ता ...
Balaji Patil ; बालाजी पाटील घोरबांड यांच्या कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

Balaji Patil ; बालाजी पाटील घोरबांड यांच्या कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

करियर, नांदेड
उस्माननगर l उस्माननगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित व्यापारी बालाजी दशरथ पाटील घोरबांड यांच्या वतीने येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसह पत्रकार, शैक्षणिक, राजकीय , सामाजिक क्षेत्रात आणि पोलिस व महसूल प्रशासनात राहून सामाजिक बांधिलकी जोपासून सेवा हीच ईश्वर सेवा समजून विधायक कार्यक्रमात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांचा श्री महारूद्र मंदिरात आयोजित हरीनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील काल्याच्या किर्तन सोहळ्यात महापुरुष व देवतांची फोटो आणि शाल , श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करून गौरव करण्यात आला. येथील श्री महारूद्र मंदीरात नुकताच अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत कथाकार म्हणून साध्वी अमृतानंद सरस्वती माताजी अकोळनेर जि.अहमदनगर यांच्या रसाळ वाणीतून कथा ऐकण्यासाठ...
error: Content is protected !!