Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Chavdi : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचन व गणन

Chavdi : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचन व गणन

करियर, नांदेड
उस्माननगर| निपून महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास व्हावा व सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडावेत. सर्व वर्गातील समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने निपून महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मार्च ते जून या महिण्यात कमजोर विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य या उपक्रमात करावयाचे आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या क्षमता चाचण्या घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दि.५ मार्च रोजी कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचनासाठी उस्माननगर ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी माणिक शेषेराव काळम, अशोक काळम, मैनादीन फकीर, शिवदास डांगे, गोळेगावकर, शिवानंद काळम आदी मान्यवर या चावडी वाचनासाठी उपस्थित होते. शाळचे मुख्याध्यापक राहुल सोन...
Appeal : अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Appeal : अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

करियर, नांदेड
नांदेड| बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती याबाबत सविस्तर जाहिरात  https://nanded.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी 24 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर व्हि.एस.बोराटे यांनी केले आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 8 ते 24 एप्रिल 2025 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागणी करण्यात येत आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी बाल विकास प...
Admission of Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश

Admission of Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश

नांदेड, करियर
नांदेड| अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2025-2026 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 20 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2025-26 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिली व दुसरीसाठी दिना...
NMMS scholarship exam ; एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी विद्यालयाचे यश

NMMS scholarship exam ; एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी विद्यालयाचे यश

नांदेड, करियर
नवीन नांदेड l डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले. या शाळेचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. विमुक्त जाती प्रवर्गातून वैभव व्यंकट जाधव,इतर मागास प्रवर्गातून वैष्णवी संतोष जाधव, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून बालाजी दिपक आरगुलवार खुल्या प्रवर्गातून वरद बालाप्रसाद गुडेवार, इतर मागास प्रवर्गातून शिवहार शंकर स्वामी,अनुसूचित जाती प्रवर्गातून श्रेया श्रीकांत गायकवाड तर खुल्या प्रवर्गातून श्रीनिवास बालाजी बडूरवार हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) साठी पात्र ठरले आहेत. यावेळी एन...
Nanded ; Entreprethon 2025 मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड चा विद्यार्थी सत्यजीत दामेकर याचे सुयश.

Nanded ; Entreprethon 2025 मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड चा विद्यार्थी सत्यजीत दामेकर याचे सुयश.

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था,विष्णुपुरी, नांदेड येथील बी.टेक.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत द्वितीय वर्षात शिकत असलेला विद्यार्थी सत्यजीत चंद्रकांतराव दामेकर यांने "Entreprethon 2025" या प्रतिष्ठित उद्योजकता विकास स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (SRTMU), वतीने Innovation, Incubation & Linkage (नवोपक्रम, उद्योजकता व संलग्नता) विभाग आणि School of Commerce & Management Sciences यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ मार्च २०२५ रोजी खुल्या स्वरूपात पदवीपूर्व व पदव्युत्तर गटामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पदवीपूर्व स्तरावरील स्पर्धेत श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था विष्णुपुरी ,नांदेड येथील बी.टेक.स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद...
MM Chamkude ; उपप्राचार्य प्रा.एमएम चमकुडे यांना पीएचडी प्रदान

MM Chamkude ; उपप्राचार्य प्रा.एमएम चमकुडे यांना पीएचडी प्रदान

करियर, नांदेड
देगलूर l येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे हिंदी विषयाचे अध्यापक तथा उपप्राचार्य प्रा. एम.एम.चमकुडे [पटेल]यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिंदी विषयात पीएचडी प्रदान केली आहे. त्यांनी "मंजूर आयतेश्याम का कथा साहित्य: एक अध्ययन "या विषयात शोध प्रबंध सादर केला आहे. या प्रबंध लेखनासाठी देगलूर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष येरावार यांचे मार्गदर्शन लाभले आहे प्रा.चमकुडे यांच्या शोध प्रबंधास मान्यता देऊन ३ एप्रिल २०२५ रोजी पी.एच डी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दलअडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश पाटील बेंबरेकर,उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार ,सचिव डॉ.कर्मवीर उनग्रतवार ,सहसचिव राजकुमार शेठ महाजन, कोषाध्यक्ष विलासशेठ तोटावार, कार्यकारणी सदस्य देवेंद्र मोतेवार , गं...
Chief Minister : मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत

Chief Minister : मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत

नांदेड, करियर
नांदेड| तहसील कार्यालय नांदेड येथे मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी "Stay Safe Online / Cyber Hygiene" सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी MyGov Campus Ambassador तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय वारकड यांच्या हस्ते झाले. मास्टर ट्रेनर दीपक सलगर यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डेटा सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक उपाययोजनांवर महत्त्वपूर्ण...
Umarkhed Agricultural College succeed : उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आयबीपीएस परीक्षेत यश; अभिनंदनाचा वर्षाव

Umarkhed Agricultural College succeed : उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आयबीपीएस परीक्षेत यश; अभिनंदनाचा वर्षाव

उमरखेड, करियर, यवतमाळ
उमरखेड/यवतमाळ| येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अमर गोडवे (पीओ, बँक ऑफ बडोदा), राम फुलकर (एएफओ, पंजाब नॅशनल बँक), प्रथम इंगोले (एएफओ, पंजाब नॅशनल बँक) आणि नेत्रदीप गरुळे (मार्केटिंग एसओ, पंजाब नॅशनल बँक) हे विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यासोबतच संघर्ष कांबळे यांनी आरोग्य सेवक म्हणून यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने आणि प्राचार्य डॉ. आर. एम. खान यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच, श्री एस. के. चिंतले आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उमरखेड कृषी महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. महाविद्यालयात...
ऑफीसर ऑफ दि‌ मन्थ साठी प्रकाश‌ कांबळे तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून संजय कुलकर्णी व सौ. सौनटक्के यांच्या सन्मान

ऑफीसर ऑफ दि‌ मन्थ साठी प्रकाश‌ कांबळे तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून संजय कुलकर्णी व सौ. सौनटक्के यांच्या सन्मान

नांदेड, करियर
नांदेड l प्रधानमंत्री आवास योजना विभागाने लेखा विभाग व लेखापरीक्षण विभाग यांच्या मदतीने आठरा दिवसांच्या कालावधीत दहा कोटी 8लक्ष रूपये निधी वितरित करून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी व‌ कर्मचारी यांच्या सन्मान चिन्ह व सत्कार करून प्रकाश‌ कांबळे यांना अफिसर ऑफ दि‌ मन्थ वरीष्ठ लिपीक संजय कुलकर्णी व‌ लिपीक वर्षा सोनटक्के यांना गौरविण्यात आले. राज्य शासनाने नोडल एजन्सी म्हाडामार्फत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस दि.10 फेब्रुवारी 25 रोजी रु. 10 कोटी 8 लाख निधी वितरीत केला होता. सदर निधी लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्याचे शासनाचे निर्देश होते. वेळोवेळी शासन स्तरावर मुख्यमंत्री व प्रधान सचिव महोदय यांच्याकडुन व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे आढावा घेण्यात येत होता. त्यामुळे सदर निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान विभागाकडे उभे होते. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना विभागाने निधी खर्च करण्याचे नियोजन ...
Vasant Kalyankar ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव

Vasant Kalyankar ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी उत्कृष्ट वसुली साठी सहाय्य करणाऱ्या कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर वसुली पोटी मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, यांच्या आदेशानुसार सिडक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जानेवारी महिन्यात एक कोटी रुपयांच्या जवळपास उत्कृष्ट वसुली करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेण्यात आली. मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यां...
error: Content is protected !!