उस्माननगर, माणिक भिसे l भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई अंतर्गत घेण्यात येणारी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2024 -25 मध्ये संत गाडगे महाराज मा. हायस्कूल कलंबर .बु. तालुका लोहा जिल्हा नांदेड ची इयत्ता दहावी ची विद्यार्थिनी कुमारी वेदिका विनोदसिंह ठाकुर हिने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत 100 पैकी 92 गुण मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.


तिचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री बेद्रे जी .आर सहशिक्षिका श्रीमती जाधव एस.एन. यांनी गोल्ड मेडल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. वेदिकाच्या या यशाबद्दल प्रतिक सर, रेणूका मॕडम, अंजली मॕडम, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे, दिपक लोखंडे, प्रदिप देशमुख व कलंबर, उस्माननगर परिसरातील हितृचिंतकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
