HomeनांदेडGanga Prasad Kakde ; माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी 1...

Ganga Prasad Kakde ; माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी 1 हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल अभिनंदन

नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये तबल एक हजार सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष, तथा महसूल मंत्री यांनी नांदेड जिल्हा परिषदचे ‌बळीरामपुर जिल्हा परिषद गंगाप्रसाद काकडे यांच्या सन्मान पत्र देऊन शुभेच्छा दिल्या मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जन मानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत.

आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून , गंगाप्रसाद काकडे यांनी समाज माध्यमांशी बोलतांना सांगितले की हे यश फक्त माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मुळेच मिळू शकले आहे ,भविष्यात दिलेला आदेशानुसार काम करीत राहील असे सांगितले त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments