नवीन नांदेड l सुभेदार रामजी आंबेडकर बुध्द विहार चारीटेबल ट्रस्ट सुभेदार रामजी आंबेडकर नगर, वाघाळा-हडको व आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुभेदार रामजी आंबेडकर बुद्ध विहार वाघाळा येथे माता रमाई आंबेडकर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


या परिषदेचे उद्घाटन पुज्य भंते पयाबोध्दी व खा.रविद्रं चव्हाण यांच्या हस्ते ऊध्दाटन होणार असून सूरेश गायकवाड हे अध्यक्षस्थानी तर व्याख्याते म्हणून ॲड.विजय गोणारकर तर विशेष उपस्थिती माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे,फारूक अहेमद, डॉ.रेखा चव्हाण,पि.एस.वाघमारे,अशोक एडके,प्रमुख पाहुणे म्हणून संजय पाटील घोगरे,पि.एस.गवळे, विठ्ठल गायकवाड,शाहुराज गायकवाड,संकेत पाटील ,सुभाष कांट कांबळे,सुजाता पोहरे, सत्यापाल सावंत ,विलास गजभारे व राजु लांडगे यांच्या सह परिसरातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शासन पुरस्कृत माता रमाई आंबेडकर या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्ती प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, स्वागत अध्यक्ष डॉ करूणा जमदाडे हे असुन या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन सुभेदार रामजी आंबेडकर बुद्ध विहार चारी टेबल ट्रस्ट व आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
