नवीन नांदेड l सिडको हडको शहर सह ग्रामीण भागातील नागरीकासाठी तिनं ठिकाणी आधार दुरूस्ती साठी परिसरात पहिले तीन सुविधा केंद्रावर आधार अद्यावत व नावात बदल करणे सोपे होते आता मात्र फक्त नांदेड मुख्य पोस्ट कार्यालय व शहरात इतर दोन जागी ही सेवा उपलब्ध असल्याने सिडको वासियांना वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन प्रशासनाने पुन्हा सिडको परिसरात दुरूस्ती केंद्र कार्यान्वित करावी अशी मागणी नागरीकातुन होत आहे.


सिडको हडको परिसरातील तिनं ठिकाणी आधार केंद्र दुरूस्ती कार्यान्वित होती, गेल्या काही महिन्यांपासून सिडको हडको परिसरातील सेतू सुविधा केंद्रावर आधार कार्ड साठी कमीत कमी तीन महिने लागत असून नाव बदलणे करणे अवघड झाले काही दिवस सिडको पोस्ट ऑफिस मध्ये काही महिने आधार अपडेट चालू होते तेथे ही बंद झाले आहे नंतर बरेच महिने बंद झाल्याने सिडको हडको परिसरातील नागरिकांनी वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करून नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालय व इतर दोनच ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे पण त्यासाठी सकाळी लवकर जाऊन रांगेत उभे रहावे लागत आहे.

याचा त्रास जेष्ठ नागरीक,वयोवृद्ध ,महिला पुरुष यांना मानसिक त्रास सहन करून असून बऱ्याच प्रमाणात आधार नोंदणी साठी हाताचे ठसे येत नसून डोळ्यांच्या द्वारे पण वेळ लागत असून लवकरच याच्यावर प्रशासनाने लक्ष देऊन सिडको येथील सेतू सुविधा केंद्र व पोस्ट ऑफिस सिडको येथे आधार दुरूस्ती केंद्र कार्यान्वित करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
