नवीन नांदेड l युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी , सिडको हडको परिसरातील युवा नेते संजय पाटील घोगरे यांच्या नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून भाजपा पक्षांत प्रवेश केला असुन या प्रवेशामुळे भाजपा पक्षाला बळकटी मिळणार आहे, भाजपा पक्ष प्रवेश नंतर संजय घोगरे पाटील यांच्ये भाजपा पदाधिकारी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे .


नवीन नांदेड भागात युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी सिडको हडको सह ग्रामीण भागात सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून अनेक रूंग्नाचे रक्तदान देऊन जिवदान दिले आहे तर ग्रामीण भागातील जवळपास चाळीस गावात शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे तर आई इंदुबाई शिवाजीराव घोगरे या सतत नावा मनपाच्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 20 नगरसेवक प्रतिनिधी असल्याने नगरसेवक प्रतिनिधी या नात्याने मनपाच्या विविध योजना व्दारे लाखो रुपयाचा निधी प्रभागात आणुन सिमेंट काँक्रीटचे रस्ता, डांबरीकरण मलनिस्सारण, पाणी, दिवाबत्ती या समस्या सोडविल्या आहेत.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संघातील निवडणूक मध्ये अपक्ष निवडणूक लढवुण जवळपास पंधरा हजार मते घेतली आहेत.

मित्र परिवार व समर्थक यांच्याशी सुसंवाद साधून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून व माजी आमदार तथा भाजपा महानगर कार्याध्यक्ष अमर भाऊ राजुरकर यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षांत 14 फेब्रुवारी रोजी पक्षप्रवेश केला असुन यावेळी भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख व पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.

नवीन नांदेड भागात संजय पाटील घोगरे यांच्या भाजपा पक्षप्रवेश मुळे राजकीय वातावरण बदलणार असुन आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत या भागाचे राजकीय समीकरण बदलणार आहे, भाजपा पक्षाचा प्रवेश नंतर संजय पाटील घोगरे यांचे भाजपा पदाधिकारी व मित्र मंडळ, समर्थक यांनी अभिनंदन केले आहे.