Ganga Prasad Kakde ; माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी 1 हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल अभिनंदन
नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये तबल एक हजार सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष, तथा महसूल मंत्री यांनी नांदेड जिल्हा परिषदचे बळीरामपुर जिल्हा परिषद गंगाप्रसाद काकडे यांच्या सन्मान पत्र देऊन शुभेच्छा दिल्या मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जन मानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य ...
