Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Gadekar Sir ; मुख्याध्यापक गादेकर सर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मठाचे वाटप

Gadekar Sir ; मुख्याध्यापक गादेकर सर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मठाचे वाटप

करियर, नांदेड
उस्माननगर l लाठ खु.ता. कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.गादेकर यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त हडको येथील जयंती महोत्सवात भीमसैनिकांना थंड मठाचे वाटप करण्यात आले. १४ एप्रिल रोजी सकाळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित भीमसैनिकांना थंड मठाचे वाटपाचे उध्दघाटन डी.एम. देवकांबळे , डुबेवाड , मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.देविदास बसवदे. या मान्यवरांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक गादेकर दत्ता , अरविंद शिंदे , डी. एम. , मारोती भोंग , ज्ञानेश्वर बाबळे , दुबेवाड , राजू , प्रशांत पेंटर यांच्या सह अनेक मित्र परिवार व पाहुणे मंडळी उपस्थित होते.यावेळी अनेकां...

10th-12th exams ; दहावी-बारावी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

नांदेड, करियर
नांदेड | फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून आपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सोमवार 21 एप्रिल 2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रस्ताव मंगळवार 15 एप्रिल पर्यंत स्विकारण्याबाबत सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आले होते. तथापि 10 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत 'आपले सरकार' सेवा पोर्टल नियमित देखभालीसाठी बंद राहणार असल्याने सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी सोमवार 21 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक / प्र...

class 10th-12th exams ; इयत्ता दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अर्जाची कार्यवाही सुरू

नांदेड, करियर
नांदेड | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जुलै-ऑगस्ट 2025 परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही मंगळवार 15 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात येत असून सदरील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. सद्यस्थितीत फक्त फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तथापि अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. शैक्षणिक वर...
State Youth Award ; राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

State Youth Award ; राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, करियर
नांदेड | जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तिन वर्षामध्ये केलेल्या कामगीरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असुन जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 साठी अर्ज सोमवार 21 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा-युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्यांनी पुरस्कराचे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असुन युवा वर्ग मोठया संख्येने, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहे. युवामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. र...
Pratibhaniketan High School ; प्रतिभानिकेतन हायस्कूलच्या 1993 बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे 19 रोजी गेट टुगेदर

Pratibhaniketan High School ; प्रतिभानिकेतन हायस्कूलच्या 1993 बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे 19 रोजी गेट टुगेदर

नांदेड, करियर
नांदेड l शहरातील कैलाशनगर येथील प्रतिभानिकेतन हायस्कूल येथील 1993 च्या दरम्यान दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेंहमिलन कार्यक्रम शनिवार दि.19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल विसावा, नांदेड येथे आयोजित केला आहे. या बॅचच्या ग्रुप मधील काही जण डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, संस्था चालक, पोलीस अधिकारी, खाजगी नोकरी, पत्रकार, तर काही जण स्वतःचा उद्योग करीत आहेत. प्रत्येकजण. कुठल्या ना क्षेत्रात आज कार्यरत आहे. लहानपणाचे बालमित्र तब्बल 32 वर्षांनंतर कोण कुठे आहे कोणालाही कल्पना नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून कांही जणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न अरीत आहेत. दहावीत असलेल्या 1993 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत आहेत. बालमित्रांचा व्हॅटस्‌ऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ग्रुप मधील सगळ्यांचा संपर्क व्हावा म्हणून गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला आहे. या माध्यमातून 32 व...
HJP College”हुजपा महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची कार्यकारी सहाय्यक पदी निवड”

HJP College”हुजपा महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची कार्यकारी सहाय्यक पदी निवड”

नांदेड, करियर
हिमायतनगर l तालुक्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाची विद्यार्थीनी "गीता राजेश चिकनेपवाड" यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत सरळ सेवेअंतर्गत घेण्यात आलेल्या गट क कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी निवड झाली आहे. ह्या यशाबद्दल गीता यांचे मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व देशाच्या माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय सुर्यकांता ताई पाटील मॅडम व संस्थेचे सचिव मा. अरुण कुलकर्णी साहेब यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम व वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. गजानन दगडे, प्रा. डॉ. संगपाल इंगळे, प्रा. मिथिलेश शेरकर यांनी गीता यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे स्टॉफ सेक्रेटरी प्रा. डॉ. डी. के. कदम, प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे, प्रा. डॉ. व्ही. व्ही. कदम, प्रा. डॉ. एस एन. भदरगे...
Shri Guru Gobind Singhji Institute ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “संकल्प १.०” या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे भव्य आयोजन

Shri Guru Gobind Singhji Institute ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “संकल्प १.०” या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे भव्य आयोजन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या समोर नव्या संधींचे क्षितिज खुले करण्यासाठी "संकल्प १.० " या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले. या परिषदेत तांत्रिक कार्यशाळा, थेट प्रकल्प सादरीकरण,शोधनिबंध सादरीकरण, उद्योगसंबंधित समस्या सोडविण्याच्या स्पर्धा, तसेच पोस्टर सादरीकरण यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळा दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी उत्साही वातावरणात पार पडला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. योगेश दशरथे,डॉ.गिरीश देशपांडे, डॉ.एस.श्रीधर,आणि रवी भोसले उपस्थित ...
District Collector : जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

District Collector : जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

नांदेड, करियर
नांदेड| जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योग तयार करुन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेवून उद्योग उभारावेत, जेणेकरुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. आज जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने तुलसी कम्फर्ट येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -२०२५ संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप दमय्यावार, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर औटी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, अग्रणी बँक व्यवस्थापक आलोकनाथ शर्मा, निर्यात सल्लागार आकाश ढगे, उद्योजक संघटनेचे शैलेष कराळे तसेच विविध शासकीय विभाग, बँकाचे प्रतिनिधी, उद्योजक, निर्यातदार, व्यापारी आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. य...
Geeta Chiknepawad Selected ; गोल्ला गोलेवार समाजातील कु.गिता चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यकपदी निवड

Geeta Chiknepawad Selected ; गोल्ला गोलेवार समाजातील कु.गिता चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यकपदी निवड

करियर, नांदेड, मुंबई
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे अंदेगाव सारख्या छोटूशा गावातील गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरळ सेवेत अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यकारी साहाय्यक पदी निवड झाली आहे. सरळ सेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या या पदासाठी एकुन १८४८ जागा उपलब्ध होत्या त्यापैकी भटक्या जमाती पैकी कूमारी गिता राजेश चिकनेपवाड हीची निवड झाली आहे. कु.गिता चिकनेपवाड हिचे वडील हे आदेगांव सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिमायतनगर व समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष या पदावर विराजमान आहेत. आदेगाव सारख्या खेड्यातील समाज हा स्त्री शिक्षणाचा अनादर करत आसतांना त्यांनी महात्मा फुले यांचे ब्रिद वाक्य स्त्रि शिक्षणाशिवाय आपल्या परीवाराचा उद्धार होणार नाही. हे वाक्य आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले व‌ आपल्या मुलीला शिक्षण देऊ केले, कुमारी गिता हिने आपल्या शिक्षणात कूठलीच कसर न ठेवता आल...

Dr. Babasaheb Ambedkar ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला मेळावा आणि निबंध स्पर्धा संपन्न

नांदेड, करियर
नांदेड | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत आज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने महिला मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कविता गंगाधर सोनकांबळे, डॉ. सुचिता संजय पेकमवार (स्त्रीरोगतज्ज्ञ), सुचित्रा भगत (समुपदेशक, महिला व बाल सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड), शकीला शब्बीर शेख (सदस्य, जिल्हा महिला सल्लागार समिती) यांनी महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता, सामाजिक भान आणि सशक्तीकरणाच्या विविध पैलूंवर प्रभावी मार्गदर्शन केले. कार्य...
error: Content is protected !!