माहूर/नांदेड। नेहमी कोणत्या ना कोणत्या उत्सव आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या औचित्य साधून माहूर गडावर लाखो भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या माता रेणुका आईच्या चरणी दिनांक 04 रोजी आरोग्य शिबिर घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या शिबिरा दरम्यान हजारो भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार व त्यांना मोफत औषधी वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
नवरात्र महोत्सवा निमित्त रेणुकाई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, नांदेड मार्फत (आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतरंगात शक्तीपीठ माहूरगड या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा, आजाराचे निदान आणि उपचार तसेच औषध वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी, कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. आई जगदंबेचे सेवा करण्याचे भाग्य रेणुकाई मल्टी स्पेशलिटीचे डॉक्टर्स तसेच स्टाफ यांना लाभल असल्याची भावना आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात जन्मलेल्या डॉ. नीलेश बास्टेवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपल्या जिल्ह्यातील गोरगरिबांना अल्प दरामध्ये उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करुन देता यावी या उद्देशाने नांदेडच्या मुख्य रस्त्यावर भव्य असे रेणुकाई मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारले आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना शासकीय योजनांमध्ये समावून घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करून यशस्वी शस्त्रक्रिया देखील केली आहे. आपले मूळ गाव असलेल्या हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी आणि औषधी वाटपाचे शिबिर घेऊन लाखो रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे.
याच उपक्रमाचा भाग म्हणून साधेतीन शक्तीपीठ पैकी महाराष्ट्रातील एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या माहूरगडावर नवरात्र उत्सवाच्या काळात लाखों भाविकांची मांदियाळी होते. त्यामुळे गर्दीत किंवा प्रवासात येणाऱ्या अडचणीत त्यांना आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने दिनांक 04 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती डॉ.नीलेश बास्टेवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्ह बोलताना दिली आहे. या शिबिरात हजारो रुग्णांनी तपासणी, निदान, उपचाराचा लाभ घेऊन आमच्या टीमला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांनी रेणुका देवी संस्थान व सर्व भाविकभक्तांचे आभार मानून नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.