नांदेड| बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी शनिवार 5 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नांदेड येथील गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे सकाळी 10 वा. आगमन झाले यावेळी माजी मुख्यानंतरी अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी स्वागत केलं.



त्यानंतर पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी 11.15 वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण, सकाळी 11.30 वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये त्यांनी जनतेला संबोधित केलं. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुपारी २.४५ ला गुरूगोविंदसिंघजी विमानतळावरून मुंबईसाठी प्रस्थान केले. गुरूगोविंद सिंघजी विमानतळावर पोहरादेवी येथून हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले. आगमनानंतर त्यांना निरोप देण्यात आला.


यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज दुपारी ठाणे येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ठाणे येथील कार्यक्रमासाठी यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर त्यांच्या सोबत रवाना झालेत.
