नांदेड। धर्माबादपासून केवळ 07 कि.मी.अंतरावर राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचे अध्यक्ष प.पू. कै.डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांचे कंदकूर्ती हे जन्मगाव आहे.तसेच रेल्वे स्थानकावर डाॅ.हेडगेवारचे नामफलक यापूर्वीच उभारल्या गेले असल्यामूळे धर्माबाद स्टेशनला कै.डाॅ.केशव बळीराम हेडगेवार नांव देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे दि.21.9.24 रोजी मा. पंतप्रधान व रेलवे मंञालय नई दिल्ली यांचेकडे जेष्ट पञकार व प्रवाशी संघटनेचे सदस्य डाॅ.एस.एस.जाधव व कंदकूर्तीकर हेडगेवार दिलीप शास्ञी यांनी केली आहे.
धर्माबाद रेल्वे स्टेशनमध्ये संघाचे संस्थापक अध्यक्षाच्या नांवे नामफलक उभारल्या गेले असून “यार्ञी प.पू. कै. केशव बळीराम हेडगेवार के जन्म स्थला कंदकूर्ती जाने के लिए धर्माबाद स्टेशन उतरीये”या स्लोगनमूळे हजारो प्रवाशासाठी संपूर्ण भारतभर धर्माबाद स्टेशन मागिल कांही वर्षापासून हे आकर्षणाचे केंन्द्र बनले आहे. डाॅ.जाधव यानीच डिव्हीजनल रेल मॅनेजर हैद्राबाद यांचे कार्यालयाकडून दि.28.10.2015रोजी सदरहू नामफलक उभारण्याची परवाणगी घेतली होती त्यामूळे माजी खा.चिखलीकर यांच्या हस्ते रेलवेस्थानकात नामफलक उभारल्या गेले होते.
एकूनच सर्व जनता,व्यापारी,राजकीय कार्यकर्ते व पञकाराची आता धर्माबाद स्टेशनचे नामकरण प.पू. डाॅ.केशव बळीराम हेडगेवारचे असे व्हावे ही भावना बनल्यामूळे डाॅ.जाधव यानी नामफलक उभारल्यानंतर पूढचे पाउल म्हणून नामकरण करण्याची मागणी पूढे रेटली आहे. तसेच या मागणीची व धर्माबाद रेलवे स्टेशनवर सर्व प्रमूख रेलवे गाड्याचे थांबे मंजूर करण्याचे जबाबदारी नांदेडच्या दोन विद्यमान खासदार मा.अजित गोपछेडे व अशोकराव चव्हाण याची असल्याचे मत डाॅ.जाधव यानी व्यक्त केले आहे.
निवेदनाच्या प्रति मा.राष्टपती, नितिन गडकरी,मोहन भागवत,आश्विनी वैष्णव,देवेन्द्र फडणवीस, मा. जिल्हाधिकारी नांदेड,खा.अजीत गोपछेडे, खा. अशोकराव चव्हाण,स्मृती समीती कंदकूर्तीचे हेडगेवार दिलिप शास्ञी,नांदेड भाजपाचे बाळासाहेब बोकारे, जनरल रेलवे मॅनेजर सिकंदराबाद,डिआरएम हैद्राबाद व डिआरएम नांदेड यांना दिलेल्या आहेत.