नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरचे भूमिपुत्र डॉक्टर एम. ए. रहमान इएनटी स्पेशालिस्ट यांना गुरुगोविंद सिंगजी मेमोरियलच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनांक 26 प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत तसेच डॉक्टर निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्याबद्दल डॉक्टर एम ए रहमान हाजी मोहम्मद मुर्तुजा सेठ यांचे हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात कौतुक केले जात असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सदर भव्य व दिव्य कार्यक्रमास डॉक्टर पेरके सर व डॉक्टर सौ भोसीकर मॅडम तसेच डॉक्टर बुट्टे सर व अनेक आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थित होते. डॉक्टर एम ए रहमान यांना प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल हिमायतनगर येथील माजी नगरसेवक अन्वर खान पठाण, अश्रफ खान, जामा मजीत कमिटीचे अध्यक्ष मुजीब खान, मोहम्मद जबी उल्ला शेख इनायत, मोहम्मद गुफ्रान माजी नगरसेवक, झुंजार पत्रकार अब्दुल मन्नान, ज्येष्ठ पत्रकार असत मौलाना, शेख अस्जत मुसा, शफी उर रहमान, अब्दुल बाकी सेट, सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेठ, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गजानन तूपतेवार, रामराव सूर्यवंशी, सुभाष शिंदे, संजय माने, पत्रकार अनिल मादसवार, पत्रकार प्रकाश जैन, पत्रकार अशोक अंगुलवार, दत्ता शिराने, देवराव हनवते, शेख अहमद हुसेन सोनारकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. एम ए रहमान हे वैद्यकीय क्षेत्रात उत्तम अशा प्रकारची प्रगती केल्याबद्दल सर्वांनी हिमायतनगरचे भूषण असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केले.
