नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको नांदेड या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जिवना सोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे, म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी ५६ स्टॉल उभारले होते, विद्यार्थ्यांनी विविध पदार्थाच्या विक्रीतून खरी कमाई केली.

शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम. देवरे यांच्या हस्ते लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंद नगरी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते.

यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून शिवाजी विद्यालयात आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला.

मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल लावले. स्टाॅलधारक विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यावेळी शाळेचे पर्यवेक्षक व्हि. एस. पाटील,स्काऊटर जी.ए.जाधव, बी. के. सुब्बनवाड, गाईडर सौ.ए.जी.देगावकर, सौ.ए.के. जांबकर, सहशिक्षक एस.आर.बीरगे, एन. पी. जाधव, ए.डी.मोरे, एस.के.अनकाडे, आर. के. चंदनशिवे, एम.जी.स्वामी आदींची व स्काऊट व गाईडसची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या होण्यासाठी शंकर कापसे, व्ही. व्ही. शिंगनवाड, गजानन सुरेवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.