Shivaji Vidyalaya ; सिडको येथे शिवाजी विद्यालयात आनंदनगरीचे आयोजन
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको नांदेड या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जिवना सोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे, म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी ५६ स्टॉल उभारले होते, विद्यार्थ्यांनी विविध पदार्थाच्या विक्रीतून खरी कमाई केली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम. देवरे यांच्या हस्ते लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंद नगरी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते.
यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून शिवाजी विद्यालयात आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपल...
