HomeनांदेडJayawardhan Bhosikar ; पत्रकार जयवर्धन भोसीकर धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित

Jayawardhan Bhosikar ; पत्रकार जयवर्धन भोसीकर धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित

नांदेड l इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना लोकजनजागृती बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्मसारथी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शहरातील पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालयात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौद्ध वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन विजयकुमार सितळे यांनी केले होते. या कार्यक्रमास भदंत पंय्याबोधी महाथेरो , प्रशांत भाऊ ननावरे, डॉ. संगीता घुगे, डॉ. करुणाताई जमदाडे,सोनू शंखपाळ,रामकुमार सोनवणे, अशोक कापशीकर, सुभाष काटकांबळे, डीपी गायकवाड, अशोक हटकर, रवी पंडित.यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना पत्रकारिता क्षेत्रातून बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार यासह विविध धम्म कार्यात सहभाग याकरिता धम्मसारथी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.भोसीकर यांना यापूर्वी आंबेडकरी चळवळीतील तुफानातले दिवे यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.

मेन स्ट्रीम मीडिया मधे त्यांनी कामाचा अनुभव, राजकीय व सर्व विषयावर ते भाष्य करत असतात त्यांनी अनेक डिबेट शो मधे आपली चमक दाखवली आहे, आंबेडकरी मीडिया साठी त्यांनी पर राज्यात जावून अनेक बातम्या केले आहेत. त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments