नांदेड| केशरबाई गणेशलालजी बाहेती चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड च्या वतीने सर्व जाती धर्मातील महिला पुरुषांकरिता घेण्यात येणारे आरोग्य तपासणी शिवीर या वर्षी खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येत असून नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

या वर्षी सीबीसी, ग्लुकोज, प्लाजमा, एच बी ए 1 सी, हेमोग्लोबिन, लिवर फंकशन टेस्ट, किडनी फंकशन टेस्ट, थायरोइड पॅनल 1, लिपीड फंकशन टेस्ट या सोबतच विटामीन डी, विटामीन बी 12, कॅल्शियम इत्यादि रक्ताच्या अनेक नवीन चाचण्या तसेच ईसीजी, बोन डेन्सिटि टेस्ट, बीएमआई यांचे सह नांदेड मधील अनेक नामांकित डॉक्टर आणि हृदयरोग तज्ञ यांचे वतीने आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

या शिबिरात प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त 150 स्त्री-पुरुषांची आरोग्य तपासणी केली जाईल. नाव नोंदणी शुल्क फक्त रुपये 1250 असून दिनांक 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान श्री रमेश डागा, गोविंदराज ज्वेलर्स सराफा, नांदेड मो. 9422172499, श्री संतोष मणियार, गणेशलाल पेपर मार्ट, गुरुद्वारा चौक मो. 9421325269, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, सन्मान प्रेसटीज, स्टेशन रोड, नांदेड मो. 9823120555, निखिल बाहेती, बाहेती एंड कंपनी पारसी अंजुमन वजीराबाद नांदेड मो. 9404809291, ओमप्रकाश इंदाणी वेंकटेश्वरा ट्रेडर्स स्टेट बँक ऑफ इंडिया, नवा मोंढा नांदेड मो. 9422171273 या पैकी कुठेही नाव नोंदणी करता येईल. नाव नोंदणी शुल्क अहस्तातरणीय आणि अपरिवर्तनीय असेल.

रक्ताच्या चाचण्या “मेट्रोपोलीस लॅब” या सुप्रसिद्ध संस्थेतर्फे 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आणि आरोग्य तपासणी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान अश्विनी हॉस्पिटल शिवाजी नगर नांदेड येथे करण्यात येतील. तरी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष निखिल बाहेती, कार्याध्यक्ष गोपाललाल लोया, सचिव प्रा. किशनप्रसाद दरक, कोषाध्यक्ष एड. अशोक भुतडा, उपाध्यक्ष एड. पुरुषोत्तम भक्कड व कार्यकारी मंडळाने केले आहे.
