Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Clarification of the State Board of Education : दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

Clarification of the State Board of Education : दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इ. १० वी ची परीक्षा दि. २१/०२/२०२५ रोजी सुरू झाली आहे. सदरच्या दिवशी सकाळ सत्रात प्रथम भाषेचे पेपर होते, या पेपरच्या वेळी जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर ता. बदनापूर जि.जालना येथील परीक्षा केंद्र कमांक ३०५० या केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याबाबत व यवतमाळ जिल्हयातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलव्दारे व्हायरल झाल्याबाबत, तसेच जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता.मंठा, जि.जालना, केंद्र क्रमांक ३४३६ या परीक्षा केंद्रासंदर्भात काही माध्यमांमधून बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर बातम्यांसंदर्भातील वस्तुस्थिती खालील प्रमाणे- १) जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर, ता. बदनापूर, जि. जालना येथील...
Mahur taluka ; माहूर तालूक्यात १११३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Mahur taluka ; माहूर तालूक्यात १११३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवार, १७ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. तालूक्यातील १११३ विद्यार्थी ४ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहे. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. बारावीच्या परीक्षेला मंगळवार, ११ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. त्या पाठोपाठ आता दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. तालूक्यात मराठी १११३ व उर्दू माध्यमाचे ५० विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. शहरातील श्री जगदंबा विघालय ३२८. तर तालुक्यातील शंकरराव ...

10th exam ; इयत्ता दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी

नांदेड, करियर
नांदेड | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत घेण्यात येणार आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी. आपले भविष्य उज्वल करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण खूप महत्वाचे आहे. परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचे कलम लागू असल्याने पालक व इतर नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात अजिबात थांबू नये तसेच झेरॉक्स मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरु ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इयत्ता 10 वीच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन केले असून जिल्ह्यातील 172 परीक्षा केंद्रावर 48 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असून 172 बैठेपथक असणार आहे. तालुका स्तरावरील विभागप्रमुख यांचे भरारी पथक आणि जिल्हा स्तरावरील भरारी पथक परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. महाराष्ट्र र...
Prof. Dr. Shivaji Bhadarge : आदर्श समाज निर्मितीसाठी आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारावे – प्रा. डॉ. शिवाजी भदरगे

Prof. Dr. Shivaji Bhadarge : आदर्श समाज निर्मितीसाठी आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारावे – प्रा. डॉ. शिवाजी भदरगे

करियर, नांदेड
हिमायतनगर| आदर्श समाज निर्मितीसाठी आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारावे असे आवाहन प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व वीर हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. सी. देशमुख यांनी केले. सदरील कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी भदरगे हे लाभले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून समाजशास्त्र विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा....
Dr. Babasaheb Ambedkar Samaj Ratna Award : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना जाहिर

Dr. Babasaheb Ambedkar Samaj Ratna Award : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना जाहिर

करियर, नांदेड
अर्धापूर| अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथील धडाडीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर घन:श्याम सोनटक्के यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. गुरु रविदास समाजसेवा मंडल आदिलाबादच्या वतीने गुरु रविदास जयंतीनिमित्त रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल २०२५ चे आयोजन गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर, आदिलाबाद येथे आयोजन करण्यात आले असून त्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलचे उदघाटन सतनामसिंघ सोखी यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक मधू बावलकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. माजी मंत्री जोगू रामन्ना, आ. पायल शंकरजी, कंदी श्रीनिवास रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती यावेळेस राहणार आहे. पत्रकार गंगा...
Navodaya Vidyalaya ; नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

Navodaya Vidyalaya ; नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

नांदेड, करियर
नांदेड | पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी "वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्र" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. SEER भारत फाऊंडेशन आणि शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे. हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. ८वी, ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषरित्या आयोजित या उपक्रमामध्ये पुष्पबंधांचे विविध प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आले.विद्यार्थ्यांना परिसरात थेट निरीक्षण करून पर्यावरणविज्ञान व वनस्पतीशास्त्र याबद्दल सखोल ज्ञान मिळावे, यासाठी शालेय ...

Scholarships ; अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

करियर, नांदेड
नांदेड | सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून 15 फेब्रुवारी 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. तथापि सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्या...
Gujarati Primary School ; गुजराती प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा संपन्न

Gujarati Primary School ; गुजराती प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा संपन्न

नांदेड, करियर
नांदेड l गुजराती प्राथमिक शाळेत वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदवला व बक्षीस पटकावले. यानिमित्त विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आज ता 18 रोजी शाळेत बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रम आयोजन करण्यात आले. छोट्या चिमुकल्यांनी आनंदात बक्षीस घेतले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीताने केले. कार्यक्रमासाठी गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक भाई दामा, सदस्य जयंतीलाल भाई पटेल, भावेशभाई नागडा, पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन दारकुंडे, सहसचिव दिव्या चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास सापडगावकर, इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक दुबे सर, भानुमती वर्मा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका दीप्ती पटेल व छंद वर्गाचे गजानन...
Vishnupuri ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड च्या 9 विद्यार्थ्यांनी मिळवली प्रतिष्ठेची सीमेन्स शिष्यवृत्ती

Vishnupuri ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड च्या 9 विद्यार्थ्यांनी मिळवली प्रतिष्ठेची सीमेन्स शिष्यवृत्ती

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नुकत्याच जाहीर झालेल्या सिमेन्स कंपनीच्या निकालात एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या 9 विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठेची सीमेन्स शिष्यवृत्ती मिळविली आहे. यामध्ये संचिता सोनवणे,प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी कृष्णाई मांगलेकर, प्रथम वर्ष,माहिती तंत्रज्ञान सपना गाडेकर,प्रथम वर्ष, माहिती तंत्रज्ञान श्रुतिका खांडील,प्रथम वर्ष, माहिती तंत्रज्ञान अभिषेक वाघ, प्रथम वर्ष, यंत्र अभियांत्रिकी मोनिका राठोड, प्रथम वर्ष, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग अनुष्का जगताप,प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी सानिका भोसले, प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान. मयुरी अलवार, प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना हे यश संपादन केल्यामुळे शिष्यवृत्ती स्वरूपात खालील फायदे मिळणार आहेत- चार वर्षाचे शैक्षणिक शुल्क ...
Sanjay Shirsat ; राज्यातील 25 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

Sanjay Shirsat ; राज्यातील 25 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नांदेड, करियर, व्हिडीओ
नांदेड | राज्यातील 25 हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली. किनवट येथील समतानगरात आयोजित चौदाव्या जागतिक धम्म परिषदेला मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर ,उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव मोरे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे.किनवटमध्ये १०० मुलांसाठी तर  माहूर व हिमायतनगरमध्ये 100 मुलींसाठी 15 ते 20 कोटी रुपयांची वसतिगृह उभारण्यात येणार असून, येत्या 3 ते 4 महिन्यात या कामा...
error: Content is protected !!