उस्माननगर, माणिक भिसे| गेली तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आसलेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. हे भावी उमेदवार सार्वजनिक कार्यक्रमात, विवाह सोहळे, जयंती, उत्सव आदी कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहत आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असल्याने गावकारभारी आत्तापासूनच कामाला लागले आहेत.


सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येकाला सरपंच झाल्या सारखं वाटत आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापत आहे. ओबीसी आरक्षणचा तिढा गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवरील काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकांची वाट पाहत होतो. या संबंधी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपल्या नेत्यांसाठी जीवाचे रान करून निवडणुका जिंकुन देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजकीय बळ देण्याची वेळ नेत्यांवर येणार आहे. कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य गट , पंचायत समिती गण आहेत. ग्रामपंतीची आरक्षण सोडत काढण्यात आली असून महीला आरक्षणामुळे गावंचा कारभार महिलांकडे येणार आहेत. तर ओबीसी प्रवर्ग , अनुसुचित जाती प्रवर्ग , अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राहणार आहेत. ज्या गावांचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे आशा गावात निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची रचना, आरक्षण, प्रारुप मतदार यादी, अंतिम मतदार यादी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होतील. उत्सुक उमेदवारांना आरक्षणाच्या सोडतीचा अडथळा पार पाडवा लागणार आहे. त्यानंतर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल.

उस्माननगर येथील ग्रामपंचायत ही सध्या कंधार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. पंधरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत वर आता पर्येत अनेक दिग्गजांनी राज केले. भाजपाचे तुकाराम वारकड गुरूजी यांनी आधिक काळ सरपंच म्हणून पद निभावले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या सामाजिक कार्यकर्ते यांना सरपंच पदाचे स्वप्न पडतं आहेत. येथील सरपंच पदाचे आरक्षण ओबिसी पुरूष साठी सुटल्याने सामाजिक कार्यकर्ते मी ऐवढा निधी मंजूर करून आनला , मी कामे केली म्हणत कोणाच्या नावाची चर्चा आहे अशी विचारणा एकमेकांना विचारताना दिसत आहेत. यावर्षी ओबीसी पुरुष असल्याने उच्च विभुती , महंत , उच्च सुशिक्षित, बेरोजगार तरुण , माजी जिल्हा परिषद सदस्य , माजी पंचायत समिती सदस्य, सेवानिवृत्त शिक्षक, माजी सरपंच , माजी उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आता पासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
जागा एक अनेकांनी आता पासूनच कंबर कसली असून नागरिकांच्या संपर्कात रहाताना दिसतात. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सुध्दा ओबीसी पुरुष किंवा महीला असल्याने दिग्गज नेते कामाला लागले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी वरून दिसणारा आहे. जर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार पाहुण मतदान झाले , तर स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत होईल का?
तुकाराम वारकड गुरूजी हे पुन्हा एकदा सरपंच पदासाठी थेट निवडणुकीत पुढे येत असल्याने अनेकांना ही निवडणूक जड जाणारी आहे. उस्माननगर सर्कल मध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत महाराजांची भुमिका महत्त्वाची रहाणार आहे.