local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उस्माननगर परिसरात इच्छुक उमेदवार लागले कामाला
उस्माननगर, माणिक भिसे| गेली तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आसलेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. हे भावी उमेदवार सार्वजनिक कार्यक्रमात, विवाह सोहळे, जयंती, उत्सव आदी कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहत आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असल्याने गावकारभारी आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येकाला सरपंच झाल्या सारखं वाटत आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापत आहे. ओबीसी आरक्षणचा तिढा गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवरील काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकांची वाट पाहत होतो. ...
