श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील आदिवासी व डोगराळ भागात वसलेल्या आनमाळ येथील अंकुश दिलीप नरवाडे वय २४ यांची अन्न व भेसळ अधिकारी (Selection for the post of Food and Adulteration Officer) पदी निवड झाल्यांने गावक-यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत,गावाच्या शिवे वरून गावात मिरवणूक काढून आगळा वेगळा आंनद साजरा केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आनमाळ येथील अंकुश नरवाडे याने अन्न व भेसळ अधिकारी पदी गवसणी घातली आहे.अतिदुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या स्पर्धेत भरारी घेत आहेत. तालुक्यातील आनमाळ सारख्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल, डोंगराळ भागातील विद्यार्थि अंकुश ने अनंत अडचणींना सामोरे जात, जिद्द व बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर अन्न व भेसळ अधिकारी पदी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. जिथे पायी चालत जाणे कठीण अशा डोंगर माथ्यावरील विद्यार्थीने यश संपादन केल्याने इतर विद्यार्थीना प्रेरणा मिळाली आहे.

अंकुशचे प्राथमिक शिक्षन १ ते ७ गावातील जिप शाळेत तर ८ ते १० वसंतराव नाईक विघालय आनमाळ ११ वि १२ वि माहूर तर पुढील शिक्षण बि,एस,सी,ॲग्रीकल्चर जळगाव येथील उल्हास पाटील विघालयात येथे पुर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करून २०२३ मध्ये स्पर्धा परिक्षा दिली. याचा निकाल १६ जानेवारी ला लागला असून अंकुश ने अन्न व भेसळ अधिकारी पदी यश संपादन केले आहे.
त्याच्या या यशाबद्दल दि,२५ रोजी ग्रामवासिया कडून जल्लोष साजरा करण्यात आला.

अंकुश आई कल्पना वडिल दिलीप नरवाडे यांची जिप्सी गाडीत बसवून ढोल- तासे, फटाक्याची आतिशबाजी करत गुलाल व फुल्लाची वृष्टी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली, ग्राम पंचायतच्या संभामडपात अंकुश च्या स्वागताची जय्यंत तयारी करण्यात आली,गावक-या कडून सरपंच, सदस्य,तंटा मुक्त अध्यक्ष,जिप शाळा, वसंत नाईक विघालय, पोलिस पाटिल संघटना,पत्रकार संघटना,अंकूश चे नातेवाईक,मित्र परीवार यांनी त्याचे अभिनंदन करत स्वागत केले. यावेळी सरपंच संभाजी फुलारी, न्यू महाराष्ट्र राज्य गा.का.पोलीस पाटिल संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटिल, संतोष दूबे, शिवप्रसाद कदम, सुखलाल राठोड, गजानन खुपसे, चंदाबाई ठाकरे,सौ अनिता बोंडलवार,धम्मदिप खिल्लारे,मानिक साळवे, राहुल वाठोरे, अविनाश नरवाडे,संदिप भवरे अदिची मंचावर उपस्थिति होती.

आभार प्रसंगी अंकुश ने शिक्षणाचा सर्व प्रवास सागितला शेतात काम करून जिप शाळेत शिकलो मला लहानपणापासून शाशकिय नौकरी करण्याची ईच्छा होती. १२ वि पर्यत आपल्याच तालूक्यात शिकलो कोणतेही सीबिएससी पॅटन नव्हत पण जिद्द होती. आई वडिलांची साथ होती,आपण खेड्यातील ग्रामीण भागातील आहोत अशी मानशिकता न ठेवता शिक्षणाची जिद्द ठेवावी असे मार्गदर्शन सत्कार समारभांतील उपस्थितत विद्यार्थीना केले व सर्व गावकरी यांचे आभार माणले.