हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्य शाळा, महाविद्यालय व विविध कार्यालयात मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा व ग्रामपंचायत, वाचनालयसह विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा (Republic day celebration) करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली.

हिमायतनगर शहरातील पोलीस स्टेशनचा ध्वजारोहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी परमेश्वर ट्रस्ट उपाध्यक्ष महाविर सेठ, माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई, माजी सभापती गजानन तुप्तेवार, अन्वरखाॅन पठाण, गौतमचंद पिंचा, संजय माने, सदाशिव सातव, गजानन चायल, पांडूरंग तुप्तेवार, आदीसह पञकार मंडळी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती जनार्धन ताडेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सचिव नागोराव माने, माजी जी.प.सदस्य समद खान, माजी संचालक रफिक सेठ, अनंता देवकते, शांतीलाल सेठ, सुभाष शिंदे, बाळूअण्णा चवरे, प्रकाश कोमावार, सर्व कर्मचारी आणि शहरातील अनेक राजकीय पक्षाचे मान्यवर संचालक मंडळी उपास्थीत होते.

ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डाॅ. श्री जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, स्टाॅफ व शहरातील प्रतिष्ठीत डाॅक्टर मंडळी उपस्थित होती. नगरपंचायत मध्ये प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड यांच्याहस्ते ध्वजारोहण झाला. नगरपंचायत मध्ये प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड यांच्याहस्ते ध्वजारोहण झाला. यावेळी प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, फेरोजखान पठाण, अश्रफ खान, फेरोज कुरेशी, मनानं भाई, आदींसह अनेक मान्यवर व जि.प. कन्याशाळा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थित होऊन सहभाग घेतला. यावेळी शहरातील अनेक मान्यवर व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. हु.ज.पा. कन्याशाळा व महाविद्यालयाचा संयुक्त ध्वजारोहन प्राचार्य रणखांब यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्वला सदावर्ते सह प्राध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शहरातील राजा भगीरथ मा.व उच्च मा.विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष शैलेश सागर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, सहशिक्षक, पालक प्रतिष्ठीत नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. गटविकास कार्यालयात गटविकास अधिकारी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर महावितरण कार्यालयात उप कार्यकारी अभियंता श्री पाटिल, सहायक अभियंता भडंगे यांच्याहस्ते ध्वजारोहन झाला.

तहसील कार्यालयात तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहन सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव, नायब तहसीलदार हराळे, ताडेवाड, भूमि अभिलेखचे उपाधीक्षक आर.आर. मोरे, विस्तार अधिकारी शिंदे, टारपे, कक्षअधिकारी पी.डी. गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शहरातील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तसेच शहरातील डार्क कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय यासह सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालय, बैंक, शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या उत्सहात प्रजसत्ताक दिन साजरा करण्यात आला.