Selection for the post of Food and Adulteration Officer : अन्न व भेसळ अधिकारी पदी निवड; गावक-यांनी काढली मिरवनूक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील आदिवासी व डोगराळ भागात वसलेल्या आनमाळ येथील अंकुश दिलीप नरवाडे वय २४ यांची अन्न व भेसळ अधिकारी (Selection for the post of Food and Adulteration Officer) पदी निवड झाल्यांने गावक-यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत,गावाच्या शिवे वरून गावात मिरवणूक काढून आगळा वेगळा आंनद साजरा केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आनमाळ येथील अंकुश नरवाडे याने अन्न व भेसळ अधिकारी पदी गवसणी घातली आहे.अतिदुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या स्पर्धेत भरारी घेत आहेत. तालुक्यातील आनमाळ सारख्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल, डोंगराळ भागातील विद्यार्थि अंकुश ने अनंत अडचणींना सामोरे जात, जिद्द व बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर अन्न व भेसळ अधिकारी पदी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. जिथे पायी चालत जाणे कठीण अशा डोंगर माथ्या...
