लोहा| निवडणूक काळात काही उपरे शिवसेना उबाठा मध्ये आले आणि पराभूत झाल्यावर चिंतन करण्याऐवजी पक्षाच्या विरोधात बोलून गेले. असाकडे दुर्लक्ष करा पक्ष संघटन वाढवा. येत्या काळात पक्षात काम करताना कोणालाही तात्काळ पदे देऊ नका. त्यांची पक्षनिष्ठा तपासून पाहावे या निवडणुकीत पक्षाचे मतदान वाढले ही शिवसेनेची ताकद आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (opposition leader Ambadas Danve) यांनी केले.

विधानसभा पराभूत उमेदवार एकनाथ पवार यांनी शिउबाठा मध्ये दलाल आहेत असे जाहीर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे व जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोह्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आली.

यावेळी निलेश भोर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावर, बबन बारसे, प स माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, माजी जि. प. सदस्य गणेश मोरे, माजी जि प सदस्य विठ्ठल शेटकर, युवा सेनेचे संघटक नवनाथ बापू चव्हाण, विधानसभा संघटक सुरेश पाटील हिलाल ,नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख पद्माकर सावंत भाऊसाहेब कदम प्रवक्ते डॉ. बालाजी पेनुरकर, हिंगोलीचे प्रमुख संदेश देशमुख, उपस्थिती होते. विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिक यांना मार्गदर्शन केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांहीं उपरे पक्षात आले अन निघूनही गेले त्यांचा विचार करू नका.

उणे दुणे काढण्यापेक्षा पक्ष संघटन वाढवा एकनिष्ठ असलेल्याना यापुढे पदे द्या. कोणत्याही उपऱ्यावर विश्वास टाकू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवा असे त्यांनी मार्गदर्शन केले. माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी मिळणार असे संकेत त्यांनी दिले. यावेळी नांदेड दक्षिण संघटक शेषेराव दिघे, कंधार तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, लोहा तालुकाप्रमुख संजय ढाले, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष रहीम कालू पठाण, परमेश्वर घोरपडे,दादाराव पाटील शिंदे, यासह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचलन संतोष हंबर्डे यांनी तर आभार बालाजी गाडेकर यांनी मानले.

माजी आ.चव्हाण निवासस्थानी, आंबेसांगवी येथे स्वागत
माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी भेट दिली युवानेत नवनाथ बापू चव्हाण यांनी सत्कार केला या नेत्या सोबत चर्चा केली तर आंबेसांगवी येथे नांदेड दक्षिण चे तालुकाप्रमुख पद्माकर सावंत यांनी नेत्यांचे जंगी स्वागत केले.