Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

manmohan singh : भारताने जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी संसदपटू गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

manmohan singh : भारताने जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी संसदपटू गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

राजकीय, नांदेड
मुंबई| देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. मनमोहन सिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला - मुख्यमंत...
Mp Ashok chavan ; माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना खा. अशोक चव्हाण यांनी वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली -NNL

Mp Ashok chavan ; माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना खा. अशोक चव्हाण यांनी वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारताचे राजकारण व अर्थकारणावर अमिट छाप सोडणारा एक थोर मुत्सद्दी, एक अर्थशास्त्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारताच्या आर्थिक उदारीकरण प्रकियेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. देशाचे अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी अर्थव्यवस्थेतील आमुलाग्र बदलांसह माहितीचा अधिकार कायदा व 'मनरेगा' सारखे महत्वपूर्ण निर्णय घेतले. दिवंगत माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात डॉ. शंकरराव चव्हाण व डॉ. मनमोहन सिंग दोघेही मंत्री होते. तेव्हापासून त्यांच्याशी माझा परिचय होता. अनेकदा आमचा संवाद होत असे. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी त्यांनी भरभरून मदत केली. गुरुता गद्दी सोहळ्याचे आयोजन करताना त्यांनी नांदेडमधील पायाभूत सुविधांसाठी दाखवलेली सकारात्मकता व केलेली भरीव मदत मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच ...
Ravindra Chavan ; खा.रवींद्र चव्हाण, खा.डॉ.काळगे यांचे आश्वासन माळेगाव यात्रेला केंद्राचा ‘अ’दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – NNL

Ravindra Chavan ; खा.रवींद्र चव्हाण, खा.डॉ.काळगे यांचे आश्वासन माळेगाव यात्रेला केंद्राचा ‘अ’दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला केंद्र सरकारचा ‘अ’दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना नांदेडचे खा.रवींद्र चव्हाण आणि लातूरचे खा.डॉ.शिवाजीराव काळगे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिल्या. विशेष म्हणजे माळेगाव येथे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठीही प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या दोन्ही खासदारांनी दिले. माळेगाव येथील खंडोबा यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा आणि नियोजन या संदर्भात खा.डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने बुधवारी दुपारी माळेगाव येथे विशेष बैठक घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी अभिजित ...
Bjp Mp Ashok chavan ; राज्यात नांदेडची भाजपा सदस्य नोंदणी सर्वाधिक असेल – माजी मुख्यमंत्री खा .चव्हाण यांचा विश्वास -NNL

Bjp Mp Ashok chavan ; राज्यात नांदेडची भाजपा सदस्य नोंदणी सर्वाधिक असेल – माजी मुख्यमंत्री खा .चव्हाण यांचा विश्वास -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार। नांदेड जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता. परंतु, केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात महायुती सरकारने केलेल्या लाेककल्याणकारी कामांमुळे नांदेडमध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीसाठी जनतेच्या माध्यमातून अच्छे दिन आले असून विधानसभेत सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा विक्रम महायुतीने केला आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची आॅनलाईन सदस्य नाेंदणी सुरु झाली असून नांदेड जिल्हा यामध्येही आघाडीवर असेल. राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी चा विक्रम जिल्ह्याच्या नावावर आपण करु, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केला. नांदेड उत्तर ग्रामीण भाजपाच्या वतीने येथील कुसुम सभागृहात आयाेजित केलेल्या भाजपा सभासद नाेंदणी कार्यशाळेचे उदघाटन करताना ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर या माेहिमेचे समन्वयक म...
Satish Deshmukh : हमीभाव आणि कर्जमाफीसाठी सतीश देशमुख यांचे विरोधी पक्षनेते खा राहुल गांधीना निवेदन -NNL

Satish Deshmukh : हमीभाव आणि कर्जमाफीसाठी सतीश देशमुख यांचे विरोधी पक्षनेते खा राहुल गांधीना निवेदन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा राहुल गांधी यांच्या कडे माजी उपहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी काल नांदेड भेटी दरम्यान केले. विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांचे काल सोमवारी नांदेड च्या श्री गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांची काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, खा रवींद्र चव्हाण, खा.वर्षा गायकवाड,जिल्हाध्यक्ष बी आर कदम, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगवकर, शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या सह काँगेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान खा राहुल गांधी यांची स्थानिक कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट घेतली. यावेळी माजी उपहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी भेटीत शेतकरी व बेरोजगार तरुणां च्या ...
Ubatha Senela Khindar in Umarkhed : उबाठा सेनेला उमरखेड मध्ये खिंडार; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -NNL

Ubatha Senela Khindar in Umarkhed : उबाठा सेनेला उमरखेड मध्ये खिंडार; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -NNL

राजकीय, उमरखेड, यवतमाळ, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| नुकतेच स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या ध्येय धोरणांवर तसेच जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री मदन येरावार व यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे नैतृत्वावर विश्वास ठेवून स्थानिक उबाठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी स्थानिक युवासेना शहरप्रमुख गोपाल कलाने यांचे नैतृत्वात व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्तदिगांबर वानखेडे यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दि २५ रोजी नितीन भुतडा यांचे लोटस या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी प्रवेशित युवा कार्येकर्त्याना भविष्यकालीन विश्वास देत नितीन भुतडा यांनी प्रवेशित सर्व कार्येकर्ते,पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासित केले. यावेळी युवासेना उपशहर प्रमुख अविनाश ठाकूर,गोपाल देवकते,शहर संघटक राजू खोपे,विभागप्रमुख सुनील कवडे,अनिल काळबां...
Adv.Dilip Thakur : धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना आज का कर्मवीर आणि इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड -NNL

Adv.Dilip Thakur : धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना आज का कर्मवीर आणि इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड -NNL

राजकीय, नांदेड
नांदेड| वर्षभरात ३६५ दिवस चालणाऱ्या तीन उपक्रमासह एकूण ८९ उपक्रम चालवून समाजसेवेचा एक आगळावेगळा पायंडा पाडणारे धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नुकतेच " आज का कर्मवीर " तसेच " इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड " हे दोन पुरस्कार मिळाले असून त्यांच्या पुरस्कारांची संख्या ९२ झाल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मुंबई येथील मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात उत्तर प्रदेशचे तुरुंग व गृहरक्षक मंत्री धर्मवीर प्रजापती यांच्या हस्ते " आज का कर्मवीर " हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, आकर्षक स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन दिलीप ठाकूर व जयश्री ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, पर्यावरण सचिव विनोद साही, कुलाब्याच्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आज का कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आर.पी.सिंग यां...
Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL

Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL

नांदेड, राजकीय
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचा आज वाढदिवस. या निमित्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत. एखाद्या नेत्याकडे समर्पित भावनेने काम करणारी कार्यकर्त्यांची टीम असणे अत्यंत आवश्‍यक आहे. जर ही टीम नेहमीच ‘ॲक्टीव्ह मोड’ वर असेल तर त्या नेत्याची राजकीय उंची अधिक वाढते. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची उर्जा निर्माण करतांनाच त्यांचे सुख, दुःख नेत्यांपर्यंत पोंहचवून त्यांच्याकडून कार्यकर्त्यांसाठी मदतीचा हात देणारा एखादा दुवा आवश्‍यक असतो. उपरोक्त वर्णन केलेल्या या सर्व बाबींमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण व कार्यकर्त्यांमध्ये दुवा म्हणून काम करण्याची महत्वपूर्ण भूमिका अमरनाथ राजूरकर नेहमीच वटव...
Mla Bhimrao Keram ; नैतिक नाईक & असोशियटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन -NNL

Mla Bhimrao Keram ; नैतिक नाईक & असोशियटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन -NNL

नांदेड, राजकीय
किनवट। येथे नैतिक नाईक & असोशियट (𝚊𝚍𝚟𝚘𝚌𝚊𝚝𝚎 &𝚝𝚊𝚡 𝚌𝚘𝚗𝚜𝚞𝚕𝚝𝚊𝚗𝚝 ,𝚊𝚞𝚝𝚑𝚘𝚛𝚒𝚜𝚎𝚍 𝚊𝚞𝚍𝚒𝚝𝚘𝚛) शाखेचे आज आम्बेडकर चौक गणपती मंदिर समोर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. किनवट/माहुर तालुक्यातील लघु उद्योजक,शैक्षणिक संस्था, व्यापारी, एन.जी.ओ तसेच विविध व्यावसायिकाना या फर्मची अद्यावत करसल्ला व करसेवा व लेखा परीक्षनाचा लाभ मिळणार आहे. नांदेड़ येथे या फर्मचे मुख्य कार्यालय असून आज किनवट येथे दूसरा शाखेचे विधिवत आमदार महोदयाच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विधी क्षेत्रातिल अनेक नामवंत मंडळीची उपस्थिती होती तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक ,किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जेष्ठ विधीतज्ञ एड,शंकर राठोड़, बाबूराव केंद्रे,बबलू नाईक,गोरसेना जिल्हाध्यक्ष अतुल राठोड़ ,एड प्रदीप राठोड़,माहुर नगर पंचयातचे नगरसेवक गोपू महामूने, अरुण राठोड़, एड राहुल नाईक,एड सुरज राठोड़, एड,चेतन नाईक, पत्...
MLA Baburao Kohlikar’s demand in the session ; पीकविम्याची ५० टक्के मर्यादा जिल्हाधिकारी व 50 टक्के विमा कंपन्याकडे ठेवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल – आमदार बाबूराव कोहळीकरांची अधिवेशनात मागणी -NNL

MLA Baburao Kohlikar’s demand in the session ; पीकविम्याची ५० टक्के मर्यादा जिल्हाधिकारी व 50 टक्के विमा कंपन्याकडे ठेवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल – आमदार बाबूराव कोहळीकरांची अधिवेशनात मागणी -NNL

नागपूर, नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नागपूर/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील विशेषतः हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे विमा भरूनही लाभापासून वंचित राहत आहे. सदर पीकविमा कंपन्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने कंपन्या आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना हक्काच्या विम्याच्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या संकटाखाली अनिखण दाबला जातो आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने यावर लक्ष केंद्रित करून पिकविम्याची मर्यादा २५ टक्क्यांवरून ५० टक्के रक्कम देण्यात लचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवायला हवा. हा निर्णय घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सत्रात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील समस्या मांडताना सभागृहात केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या सभागृहात आपली भुमिका मांडताना पुढे हदगाव विधानसभा मतदार संघा...
error: Content is protected !!