Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Protest against amit shah ; वाघाळा शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी नांदेड यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेध -NNL

Protest against amit shah ; वाघाळा शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी नांदेड यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेध -NNL

नांदेड, राजकीय
नविन नांदेड। वाघाळा‌ शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी आय नांदेड यांच्या वतीने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 21 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकेरी उल्लेख करून अपमान करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी निषेध नोंदविला व‌ पंतप्रधान यांच्या कडे निवेदनाद्वारे राजीनामा घेऊन पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. भारत देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी दि. 17 डिसेंबर 24 रोजी दिल्ली येथील संसद भवनामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत "अभि एक फैशन हो गया है। आंबेडकर आंबेडकर आंबेडकर" इतक नाव देवाचे घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेले असते असे विधान करुन देशातील शोषीत, वंचित, कष्टकरी, कामगार, स्त्री, मोलमजुर, युवक, जेष्ठ यांच्या भावना दुखावल्या असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा हेतूपूर्वक प्...
Dr. Abhishek Saude ; भाजपाचे डॉ अभिषेक सौदे यांना राष्ट्रीय अटल गौरव भूषण सन्मान – NNL

Dr. Abhishek Saude ; भाजपाचे डॉ अभिषेक सौदे यांना राष्ट्रीय अटल गौरव भूषण सन्मान – NNL

नांदेड, राजकीय
 नांदेड ‌l अटल फाउंडेशन देशसेवेच्या निरंतर कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल या उल्लेखनीय कार्याच्या स्वरूपात विशेष कौशल्य यांचे कौतुक करून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र तथा भाजपाचे निष्ठावंत म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध असलेले असे डॉ. अभिषेक रमेशराव सौदे जी यांना 2024 या वर्षाचा अटल गौरव (सन्मान) अवॉर्ड (पुरस्कार) अलंकारिक केलेले प्रशासकीय पत्र मेडल व सन्मान पत्र नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय तीन मूर्ती, नवी दिल्ली येथे आज सन्मान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी अटल फाउंडेशन राष्ट्रीयच्या अध्यक्षा सौ.अपर्णा सिंह त्रिपाठी, माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जातीया ,भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजु ,जयपूर खासदार मंजुषा शर्मा जयपूर महापौर सौम्या गुज्जर व अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष गणेश राजे, अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोविंद शिंदे,...
Mla.Shri Jayatai Chavan’s demand : 150 कोटींचा निधी देऊन जलजीवनची कामे पूर्ण करा – आ. श्रीजयाताई चव्हाण यांची विधानसभेत मागणी – NNL

Mla.Shri Jayatai Chavan’s demand : 150 कोटींचा निधी देऊन जलजीवनची कामे पूर्ण करा – आ. श्रीजयाताई चव्हाण यांची विधानसभेत मागणी – NNL

नांदेड, राजकीय
नागपूर| भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड, अर्धापूर आणि भोकर तालुक्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर एकूण 120 कामांपैकी केवळ 27 कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 93 कामे अद्याप प्रलंबित आहेत किंवा सुरुच झालेली नाहीत. उर्वरित कामांसाठी प्रथमतः 150 कोटी रुपयांचा निधी देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी आज हा महत्वपूर्ण विषय विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत भोकर विधान मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातील 32 कामांपैकी 13 कामे पूर्ण झाली असून, 4 कामांकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. अर्धापूर तालुक्यातील 28 कामांपैकी 10 कामे पूर्ण झाली असून, 9 का...
Mla. Chikhlikar : लोहा मतदार संघात इंजेक्शन व गोळ्या घेतलेला पहेलवान चालत नाही – आ. चिखलीकर -NNL

Mla. Chikhlikar : लोहा मतदार संघात इंजेक्शन व गोळ्या घेतलेला पहेलवान चालत नाही – आ. चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| विधानसभा मतदार संघात इंजेक्शन व गोळ्या घेतलेला पहेलवान चालत नाही.दंड व मांड्या थोपटणारे मल्ल कुठे दिसले नाहीत.कोणाला कोणता पेच घालावा लागती .हे गेल्या तीस चाळीस वर्षात आम्हाला कळले आहे राजकीय आखाड्यात मेहनती व कसरत करणारा पहेलवान कुस्ती जिंकत असतो, जनतेनी नेहमीच मदतीला धावून जाणाऱ्या व काम करणान्यां माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास साथ दिली आहे आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.व विकासासाठी निधी कमी पडणार नाही असा विश्वास नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. आष्टूर (ता. लोहा) येथे प्रभु दतात्रय यांच्या यात्रे निमित आयोजित भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली त्या उद्‌घाटन प्रसंगी आ० प्रतापराव पाटील चिखलीकर बोलत होते. यावेळी युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, माजी पं.स. सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,सचिन पाटील चिखलीकर, स्वप्न...
Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL

Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL

नागपूर, नांदेड, राजकीय
नागपूर/हिमायतनगर। विधानसभा 2024 निवडणूक काळात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि 19 डिसेंबर रोजी सिपी क्लब, नागपूर येथे आयोजित विशेष बैठकित मार्गदर्शन केले. तसेच नांदेड उत्तरचे सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, नांदेड महानगरचे उमेश सरोदे यांचा सन्मान केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने फेक निरेटिव्ह पसरवून मतदारांची दिशाभूल केल्यामुळे महायुतीला फटका बसला होता. याचे सूक्ष्म निरीक्षण करून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया व आयटी सेलने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा क्षेत्रात प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार...
Deputy Chief Minister Eknath Shinde : तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -NNL

Deputy Chief Minister Eknath Shinde : तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -NNL

नागपूर, राजकीय
नागपूर| महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले. मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला. अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आ...
CIDCO ; सिडको स्वामी समर्थ केंद्र येथे भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय‌ कौडगे यांनी घेतले दर्शन, महाआरती – NNL

CIDCO ; सिडको स्वामी समर्थ केंद्र येथे भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय‌ कौडगे यांनी घेतले दर्शन, महाआरती – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे दत्तजयंती निमित्ताने आयोजित अखंड दतनाम जप यज्ञ सोहळ्यास भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी भेट देऊन दर्शन घेऊन महाआरती केली यावेळी केंद्राच्या वतीनेभाजपा अनुसूचित जाती जमाती नांदेड शहर महानगर अध्यक्ष तथा सेवेकरी नवनाथ कांबळे यांनी स्वागत केले. स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे श्रीदत जयंती निमित्ताने 9ते 16डिसेबंर सप्ताह आयोजित करण्यात आला होता, यावेळी सप्ताह अंतर्गत चौथ्या दिवशी भाजपाचे संघटन मंत्री संजय कौडगे यांनी मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांचा हस्ते महाआरती करण्यात आली, सेवेकरी नवनाथ कांबळे व विनायक आकुरके यांनी स्वागत करून सत्कार केला....
Kedar patil salunke ; काँग्रेसने 4 वेळा मुख्यमंत्री दिलेल्या नांदेड जिल्ह्यांतील जनतेनी महायुती सरकारला दिलेल्या बहुमतांचा साधा मंत्री ही न देता अपमान केला –  केदार पा. साळुंके -NNL

Kedar patil salunke ; काँग्रेसने 4 वेळा मुख्यमंत्री दिलेल्या नांदेड जिल्ह्यांतील जनतेनी महायुती सरकारला दिलेल्या बहुमतांचा साधा मंत्री ही न देता अपमान केला –  केदार पा. साळुंके -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड। नांदेड जिल्ह्यांच्या आज पर्यंतच्या राजकीय इतिहासात काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्याला अनेक वेळा मंत्री, चार वेळा मुख्यमंत्री तर; केंद्रीय गृहमंत्री अशा देशाच्या सर्वोच्च पदांवर संधी दिली असता त्याच जिल्ह्याने आज जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा भाजपा - महायुतीला दिल्या मात्र; साधे मंत्रीपदही दिले नसल्याने भाजप - महायुतीने नांदेडच्या जनतेचा अपमान केला असल्याचं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस, श्री. केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यांच्या राजकारणामध्ये आजपर्यंत प्रत्येक वेळी जिल्ह्याला मंत्रीपद तर दिलेचं तर त्याहून अधिक चार वेळा मुख्यमंत्रीचं नव्हे; तर देशाचे सर्वोच्च केंद्रीय गृहमंत्री पदं ही दिलेलं आहे. मात्र; आज घडीला केंद्रामध्ये भाजपा - एन. डी. ए. चे सरकार आहे जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार आहेत, तर; महाराष्ट्रामध्ये देखील...
Government’s preparation for detailed discussion : बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी -NNL

Government’s preparation for detailed discussion : बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी -NNL

नांदेड, राजकीय
नागपूर| बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल असे स्पष्ट केले....
Governor CP Radhakrishnan : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ -NNL

Governor CP Radhakrishnan : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ -NNL

नांदेड, नागपूर, राजकीय
नागपूर| राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अॅड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अॅड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पा...
error: Content is protected !!