HomeनांदेडMla.Shri Jayatai Chavan's demand : 150 कोटींचा निधी देऊन जलजीवनची कामे पूर्ण...

Mla.Shri Jayatai Chavan’s demand : 150 कोटींचा निधी देऊन जलजीवनची कामे पूर्ण करा – आ. श्रीजयाताई चव्हाण यांची विधानसभेत मागणी – NNL

नागपूर| भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड, अर्धापूर आणि भोकर तालुक्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर एकूण 120 कामांपैकी केवळ 27 कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 93 कामे अद्याप प्रलंबित आहेत किंवा सुरुच झालेली नाहीत. उर्वरित कामांसाठी प्रथमतः 150 कोटी रुपयांचा निधी देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.

नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी आज हा महत्वपूर्ण विषय विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत भोकर विधान मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातील 32 कामांपैकी 13 कामे पूर्ण झाली असून, 4 कामांकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. अर्धापूर तालुक्यातील 28 कामांपैकी 10 कामे पूर्ण झाली असून, 9 कामे तांत्रिक कारणास्तव बंद आहेत, तर 9 कामे सुधारित प्रशासकिय मान्यतेसाठी प्रलंबित आहेत.

भोकर तालुक्यातील 60 कामांपैकी केवळ 4 कामे पूर्ण झाली असून, 9 कामे प्रगतीपथावर आहेत, तर 15 कामे बंद आहेत आणि 31 कामे सुधारित प्रशासकिय मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. या सर्व कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments