Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shankarrao Chavan ;  व्यापारी संकुल आ.बोढारकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

Shankarrao Chavan ; व्यापारी संकुल आ.बोढारकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नावामनपाचा मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत दोन कोटी पन्नास लक्ष रूपयांचा शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल अंतर्गत असलेल्या स्वामी समर्थ नगर ते असदवन रोड पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट कामांचा शुभारंभ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या पाठपुराव्या मुळे व दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,यांच्या प्रयत्नाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या उपस्थितीत 9 जुनं रोजी करण्यात आला. सिडको परिसरातील शंकरराव चव्हाण मोढा प्रकल्प अंतर्गत मधील स्वामी समर्थ नगर ते असदवन रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचा कामामुळे मोढा प्रकल्पातील अनेक मालमत्ता धारकांना व असदवन वाशियांना यांच्या फायदा होणार आहे. शुभारंभ प्रसंगी शहर प्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,शहर अभियंता सुमंत पाटील,उप अभियंता अरूण शिंदे,जगदीश सिंग महाजन ,कनिष्ठ अभियंता किरण सु...
Formar mla shankaranna dhondage ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढणार -माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Formar mla shankaranna dhondage ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढणार -माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बाचोटीतून झाली. माजी खासदार शरद जोशी यांची प्रेरणा घेऊन संपूर्ण राज्यात शेतकरी संघटनेची मोठी भक्कम फळी निर्माण केली. प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी अनेक वेळेस निवडणुका लढवल्या. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक दिवस कारावास भोगला. राजकीय जीवनात चढ- उतार येत असतात मी घाबरणारा कार्यकर्ता नाही कितीही चढ- उतार आले तरी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझा पाठीशी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यात व्यापक चळवळ उभी करत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याची ग्वाही बाचोटी येथील रसाळी कार्यक्रमात माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यावतीने बाचोटी तालुका कंधार येथे दि ५ जून रोजी रसाळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, ज्ये...
Amit Deshmukh : माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी घेतली बाभळगाव येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची भेट

Amit Deshmukh : माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी घेतली बाभळगाव येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची भेट

नांदेड, राजकीय, लातूर
लातूर| राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज, बुधवार दि. ४ जून रोजी सकाळी बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहर आणि जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटना, काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या शांतपणे समजून घेतल्या. त्यांची निवेदने आणि निमंत्रणे स्वीकारून, संबंधितांना तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत झाली. याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,...
local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उस्माननगर परिसरात इच्छुक उमेदवार लागले कामाला

local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उस्माननगर परिसरात इच्छुक उमेदवार लागले कामाला

नांदेड, राजकीय
उस्माननगर, माणिक भिसे| गेली तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आसलेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. हे भावी उमेदवार सार्वजनिक कार्यक्रमात, विवाह सोहळे, जयंती, उत्सव आदी कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहत आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असल्याने गावकारभारी आत्तापासूनच कामाला लागले आहेत. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येकाला सरपंच झाल्या सारखं वाटत आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापत आहे. ओबीसी आरक्षणचा तिढा गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवरील काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकांची वाट पाहत होतो. ...
Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच राजकीय विरोधकाना “चकमा”

Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच राजकीय विरोधकाना “चकमा”

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अखेर ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतल्याचे चित्र होते. भाजपात त्यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असताना, गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यानंतर मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले. हदगाव हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात माजी आ.जवळगावकर यांचा भाजप प्रवेश अमित शहा यांच्या उपस्थितीत "शंखनाद" मेळाव्यात होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्यांनी अनेक राजकीय जाणकाराचे अंदाज चुकविले प्रत्यक्षात त्यांनी भाजपात प्रवेश न करता आयोजित काँग्रेसच्या तिरंगा रॅलीत सहभागी होत "मी काँग्रेस मध्येच आहे" असा स्पष्ट संदेश दिला. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणं रचली गेली होती. अनेकांच अंदाज चुकला. विशेषतः हदगाव विधान सभाक्षेत्राचे विद्यमान आ.बाबुराव कदम कोहीळकर य...
Minister Zirwal ; मंत्री झिरवळांचा साधेपणा इस्लापूर येथे ताफा थांबवून साध्या दुकानात केली दाढी

Minister Zirwal ; मंत्री झिरवळांचा साधेपणा इस्लापूर येथे ताफा थांबवून साध्या दुकानात केली दाढी

नांदेड, राजकीय
नांदेड। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दि. २ रोजी आपल्या साधेपणाने पुन्हा सर्वांची मने जिंकली असून, किनवट तालुक्यातील शेतकरी मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री झिरवळ यांनी, प्रवासादरम्यान अचानक आपला ताफा थांबवला आणि थेट इस्लापूर येथे रस्त्याच्या कडेच्या एका साध्या कटींगच्या दुकानात जात दाढी केली. यानंतर नागरिकांशी झिरवळ यांनी संवाद साधला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे साधे राहणीमान, ग्रामीण संवाद शैली सर्वदूर परिचित आहे. याच साधेपणाचा पून्हा एकदा सर्वांना परिचय आला आहे. दि. २ जून रोजी सकाळी मंत्री नरहरी झिरवळ किनवट तालुक्यातील शेतकरी मेळाव्यासाठी ताफ्यासह निघाले होते. इस्लापूर गावात पोहचताच झिरवळ एका छोट्याशा कटिंगच्या दुकानासमोर ते यांवले आणि कोणताही आडपडदा न ठेवता, थेट दुकानात जाऊन दाढी केली. त्यांच्या सोवत असलेल्या...
Former MLA Shankar Anna Dhondge : गाव तिथे महाराष्ट्र राज्य समितीची शाखा स्थापन करणार – मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे

Former MLA Shankar Anna Dhondge : गाव तिथे महाराष्ट्र राज्य समितीची शाखा स्थापन करणार – मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार,सचिन मोरे| महाराष्ट्र राज्य समिती पक्षाच्या स्थापनेला ऑक्टोबर २०२५ ला एक वर्ष होत असून महाराष्ट्राच्या सर्व विभागात एमआरएस पक्षाचे नेते व कार्यकर्त्याकडून पक्ष बांधनीच्या कामाला सुरुवात झाली असून जनतेकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंधार- लोहा तालुक्यासह जिल्हायातही पक्षाच्या वर्षपूर्ती पर्यंत गाव तिथे ( एमआरएस) पक्षाची शाखा कार्यरत करनार असी माहीती पक्ष प्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकर परिषदेत दिली. सध्या राज्याची सामाजीक, राजकीय, आर्थीक परिस्थीती बिकट झाली असून उपलब्ध माहिती नुसार-सिंचन,शिक्षण, रोजगार, आरोग्य, उर्जा, व दरडोई उत्पन्नात राज्य मागे पडले आहे. शेतकऱ्यांची अपेक्षित असलेली व सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिलेली कर्जमाफी, पिक, विमा, शेतीमाला मिळनारा कमी भाव यामुळे संपूर्ण शेतकरी समाज आर्थीक संकटात सापडला आहे. बेरोजगार युवकाना रोजगार मिळत न...
Visit of Food and Drug Administration Minister Narhari Jirwal : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा

Visit of Food and Drug Administration Minister Narhari Jirwal : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 2 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 1 जून 2025 रोजी नाशिक येथून रात्री 7.55 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने सहस्त्रकुंड जि. नांदेडकडे प्रयाण. सोमवार 2 जून 2025 रोजी सकाळी 7 वा. सहस्त्रकुंड जि. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व इस्लामपुर शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण व राखीव. सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह इस्लापूर येथून सहस्त्रकुंड धबधबाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. सहस्त्रकुंड धबधबा नांदेड येथे शेतकरी बांधवासोबत भेट व चर्चा. सकाळी 10 वा. श्रीमती भाग्यरथाबाई शेषराव मिराशे यांची कन्या चिसौका. सोनु यांचे विवाहास उपस्थिती. स्थळ- थारा ता. किनवट जि. नांदेड . सकाळी 11 वा. थारा जि. नांदेड, किनवट येथून हुडी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. श्री. निर्गुण कदम यांचे फार्महाऊस येथ...
MLA Bondharkar : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता नागरिकाचे प्रश्न सोडवा…. आमदार बोंढारकर

MLA Bondharkar : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता नागरिकाचे प्रश्न सोडवा…. आमदार बोंढारकर

राजकीय, नांदेड
नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडण्याचे माझे कर्तव्य असून, मी आमदार नसून जनतेचा सेवक म्हणून काम करतो. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडावे. अन्यथा त्यांचे परिणाम भोगावे लागतील असे खडे बोल आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सोनखेड येथे जनता दरबारच्या वेळी बोलताना व्यक्त केले. दिनांक 31 मे रोजी बाजार मैदान सोनखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर व जनता दरबार घेण्यात आला. या अभियानाला तहसीलदार विठ्ठल परळीकर गटविकास अधिकारी दशरथ आडे राघो वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता सुतार जि प चे बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी राठोड तालुका आरोग्य अधिकारी जगदीश कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुदर्शन गव्हाणे ग्रामविकास अधिकारी संदीप कच्छवे महसूल मंडळा अधिकारी तानाजी सुगावे...
MLA Baburao Kadam demands : वरवटच्या दुर्घटनाग्रस्त कुटूंबास आर्थिक मदत द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार बाबुराव कदम यांनी केली मागणी

MLA Baburao Kadam demands : वरवटच्या दुर्घटनाग्रस्त कुटूंबास आर्थिक मदत द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार बाबुराव कदम यांनी केली मागणी

नांदेड, राजकीय
मुंबई/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील वरवट येथील शेतमजूर महिला आपली मुलगी व पुतणीसह घरी परत येत असताना पुरात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्य दुःखाच्या सावटात अडकले असून, त्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. हदगाव तालुक्यातील मौजे वरवट येथील सौ. अरुणा बळवंत शकरगे वय ३५ कु. दुर्गा बळवंत शकरगे वय १० कु. समिक्षा विजय शकरगे वय ७ ह्या शेतामध्ये हळद लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान झालेल्या दोन तास ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आहे. अचानक आलेल्या पाण्याचा प्रवाह वाहून जाऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील महिला व लहान २ मुली मृत्युमुखी पडल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळला आहे. तर संपूर्ण पर...
error: Content is protected !!