कंधार,सचिन मोरे| महाराष्ट्र राज्य समिती पक्षाच्या स्थापनेला ऑक्टोबर २०२५ ला एक वर्ष होत असून महाराष्ट्राच्या सर्व विभागात एमआरएस पक्षाचे नेते व कार्यकर्त्याकडून पक्ष बांधनीच्या कामाला सुरुवात झाली असून जनतेकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंधार- लोहा तालुक्यासह जिल्हायातही पक्षाच्या वर्षपूर्ती पर्यंत गाव तिथे ( एमआरएस) पक्षाची शाखा कार्यरत करनार असी माहीती पक्ष प्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकर परिषदेत दिली.


सध्या राज्याची सामाजीक, राजकीय, आर्थीक परिस्थीती बिकट झाली असून उपलब्ध माहिती नुसार-सिंचन,शिक्षण, रोजगार, आरोग्य, उर्जा, व दरडोई उत्पन्नात राज्य मागे पडले आहे. शेतकऱ्यांची अपेक्षित असलेली व सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिलेली कर्जमाफी, पिक, विमा, शेतीमाला मिळनारा कमी भाव यामुळे संपूर्ण शेतकरी समाज आर्थीक संकटात सापडला आहे.

बेरोजगार युवकाना रोजगार मिळत नसल्याने तरुन पिढी निराशेच्या गर्तेत अडकली आहे. अलीकडच्या काही वर्षात राज्यात राजकीय स्वार्थापायी सामाजिक तानतनाव वाढवण्यात आल्यामुळे सामाजीक स्वाथ्य सूध्दा बिघडले आहे. या सर्व बाबतची वस्तुस्थिती लक्षात घेवून भविष्यात यावर योग्य उपाय करता यावा यासाठी एमआरएस पक्षाची स्थापना करण्यात आली असून (एमआरएस ) पार्टीने ध्येय, धोरण व कृतीसाठी पक्षाच्या पंचसुत्री कार्यक्रमाधारे काम करण्याचे निश्चित केले आहे.

ती पंचसूत्री खालील प्रमाणे
१.शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र
२. ई.व्हि.एम.मुक्त निवडणूका
३. शेती, शिक्षण, आरोग्य, सिंचन, विज, उद्योगासाठी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद
४. तंत्रज्ञाणाची सुलभ उपलब्धता.
५. शेतकरी, कष्टकरी, कामगार बेरोजगार व महीलांना कायदेशीर संरक्षण.
या पंचसूत्रीचा अवलंब करत आम्ही सर्व महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे माजी आमदार धोंडगे यांनी यावेळी सांगितले.
५ जून रोजी बाचोटी येथे रसाळीचे आयोजन
मी गेल्या ४० वर्षापूर्वी बाचोटी येथून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माजी.खासदार शरद जोशी यांच्या कार्याची प्रेरणा घेत शेतकरी संघटनेचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझ्या कार्याची सुरुवात केली. मी अनेक वर्षे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा अध्यक्ष देखील राहिलो. लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्धनाच्या आशीर्वादाने आमदार झालो. गेल्या ४ दशकात राज्यभरात हजारो मित्र जोडले,अनेक वेळा जेल भोगली,शेकडो आंदोलने केली कुठलीच राजकीय परिस्थिती नसताना शून्यातून कर्मभूमीतील विकासाचे, जिव्हाळाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे अहोरात्र प्रयत्न केले.

माझ्या सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बाचोटी येथे रसाळीच्या भोजनाची परंपरा अनेक वर्षांपासून अविरत सुरू असून ती परंपरा कायम चालूच राहणार आहे त्या करिता ५ जून रोज गुरुवारी बाचोटी येथील महादेव मंदिराजवळील आंबा बागेत कार्यकर्ते, स्नेही,मित्र, हितचिंतक, चाहते व पाहुणे मंडळीनी रसाळी भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदे द्वारे केले आहे. या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ शेतकरी नेते दत्ताजी पवार, दिगंबरराव पाटील दांडेगावकर, युवा नेते शिवराज पाटील धोंडगे,दिलीप पाटील धोंडगे,सुभाष मोरे , प्रा. खान सर , रमेश मोरे, संतोष कागणे यांची उपस्थिती होती.