देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील वझरगा येथे राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (३००) व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम महाराष्ट्रातील एकमेव अशा अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजा व पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन करत साजरी करण्यात आली.


यावेळी वझरगा येथील जयंतीमहोत्सव समितीकडून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख जिल्हा महेश पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य नागनाथ वाडेकर व गावातील प्रथम नागरिक सरपंच रुक्माजी औरादे, उपसरपंच बाबुराव सूर्यवंशी, डॉ गोविंद पाटील, पोलिस निरीक्षक शिवाजीराव सुर्यवंशी, माजी सरपंच मारोतराव कोकणे, पोलीस पाटील मारोतराव पाटील आदी मान्यवरासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
