नांदेड। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दि. २ रोजी आपल्या साधेपणाने पुन्हा सर्वांची मने जिंकली असून, किनवट तालुक्यातील शेतकरी मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री झिरवळ यांनी, प्रवासादरम्यान अचानक आपला ताफा थांबवला आणि थेट इस्लापूर येथे रस्त्याच्या कडेच्या एका साध्या कटींगच्या दुकानात जात दाढी केली. यानंतर नागरिकांशी झिरवळ यांनी संवाद साधला.


राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे साधे राहणीमान, ग्रामीण संवाद शैली सर्वदूर परिचित आहे. याच साधेपणाचा पून्हा एकदा सर्वांना परिचय आला आहे. दि. २ जून रोजी सकाळी मंत्री नरहरी झिरवळ किनवट तालुक्यातील शेतकरी मेळाव्यासाठी ताफ्यासह निघाले होते. इस्लापूर गावात पोहचताच झिरवळ एका छोट्याशा कटिंगच्या दुकानासमोर ते यांवले आणि कोणताही आडपडदा न ठेवता, थेट दुकानात जाऊन दाढी केली. त्यांच्या

सोवत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकही काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाले. मात्र, झिरवळ यांनी अत्यंत सामान्य आणि साध्या पद्धतीने, कटिंगच्या दुकानातील स्थानिक न्हाव्याशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधत दाढी करून घेतली. राज्याचे मंत्री गावातील एका दुकानात दाढी करण्यासाठी थांवले असल्याची वातमी समजताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. अनेकांनी मंत्री झिरवळांचे फोटो व व्हिडीओ मोवाईलमध्ये टिपले.

इस्लापूरमधील जनतेने त्यांचे साधेपण व सहज वागणे याचे कौतुक केले. मंत्री झिरवळ हे आपल्या साध्या व सामान्य जीवनशैलीसाठी ओळखले जातात. मोठ्या थाटामाटात न राहता, सामान्य जनतेसारखे वागणे आणि संवाद साधणे, हीच त्यांची ओळख आहे, आणि पुन्हा एकदा या साधेपणाचा परिचय आला. राज्याचे मंत्री असूनही अंत्यत साधे आणि सामान्य नागरिकांसारखे वर्तन ठेवणाऱ्या झिरवळ यांच्या किनवट दौऱ्याची चांगलीच चर्चा होत आहे.
