Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ashok Chavhan ; पाच दिवसात पंचनामे पूर्ण करा – खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनाला सूचना

Ashok Chavhan ; पाच दिवसात पंचनामे पूर्ण करा – खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनाला सूचना

नांदेड, राजकीय
नांदेड/ वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पुढील पाच दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आहे. खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी आज अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी अवगत केले. यावेळी हदगावचे आ. बाबुराव कोहळीकर तसेच महसूल, कृषी, वीज आदी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विमा कंपनीचे प्रतिनिधी देखील देखील उपस्थित होते. पंचनामे वेगाने पूर्ण व्हावेत यासाठी ड्रोनचा जास्तीत जास्त वापर करण्या...
Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

नांदेड, राजकीय
नांदेड| मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यतः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे केळी सह फळबाग व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना मुख्यानेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नामदार हेमंत पाटील यांनी केली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे,पशूंचे नुकसान झाले आहे .यामध्ये प्रामुख्याने केळी बागा जमीनदोस्त झाल्याने  केळीच्या दरात  घसरण झाली असून ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच नदी नालयांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली आहे. त्यामुळेअतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून नुकसा...
Nanded-Nagpur National Highway block : नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन; कर्जमाफीसाठी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Nanded-Nagpur National Highway block : नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन; कर्जमाफीसाठी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

नांदेड, राजकीय
नांदेड| शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां व केळीला हेक्टरी तीन लाखांची मदत देण्यात यावी मागणीसाठी शिव सेना ठाकरे गटाने नांदेड नागपूर रस्त्यावर चक्क जाम आंदोलन करत महायुतीच्या शासनाला विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.हे रास्ता रोको आंदोलन पिंपळगाव महादेव पाटी परिसरात करण्यात आले.या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गटाने महायुतीच्या सरकार विरोधात एल्गार पुकारला असुन क्या हुवा तेरा वादा' म्हणत महायुतीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येत आहे.नांदेड जिल्हा शिवसेनेचा वतीने नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव महादेव पाटी परिसरात चक्क जाम आंदोलन करुन आपल...
MLA Baburao Kadam Kohlikar : वाढदिवस साजरा करणार नाही ; कुणीही हार तुरे आणूनये – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

MLA Baburao Kadam Kohlikar : वाढदिवस साजरा करणार नाही ; कुणीही हार तुरे आणूनये – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| 13 जानेवारी रोजी होणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. कारण सध्या यंदा ९ जून २०२५ रोजी हदगाव हिमायतनगर तालुका परिसरात झालेल्या वादळवाऱ्यांमुळे, केळी, पपई, ऊस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. अशा कठीण प्रसंगी, आपण सर्वांनी त्यांच्या सोबत संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे यावर्षी माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही. त्यामुळे वाढदिवसा दिवशी माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते, हितचिंतक यांनी कि=ओनीही हार तुरे आणू नये मी कसल्याही प्रकारच्या शुभेच्छा स्वीकारणार नाही असे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले. माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपल्याकडून मनापासून शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद मिळतात. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. मात्र, यंदा ९ जून २०२५ रोजी आपल्या परिसरात आलेल्या वादळवाऱ्यांमुळे, केळी, पपई, ऊस ...
What happened to your argument? : क्या हुआ तेरा वादा ? महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेचा जिल्ह्यात ट्रॅक्टर मोर्चा धडकला

What happened to your argument? : क्या हुआ तेरा वादा ? महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेचा जिल्ह्यात ट्रॅक्टर मोर्चा धडकला

नांदेड, राजकीय
नांदेड| केवळ विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शेतकरी , शेतमजूर आणि मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करत आश्वासनाच्या खैराती वाटल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे गाजर दाखवून त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने नांदेड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात आज भोकर, मुदखेड ,अर्धापूर आणि मुखेड तहसील कार्यालयांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला . या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात आज काढण्यात आलेल्या ' क्या हुआ तेरा वादा ' ट्रॅक्टर मोर्चात अर्धापूर तालुका प्रमुख संतोष कल्याणकर , शहरप्रमुख काजी सलाउद्दीन, पंचायत समितीचे उपसभापती अशोक कपाटे , अशोक डांगे ...
Nanded Municipal Commissioner : नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

Nanded Municipal Commissioner : नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दिनांक 10.06.2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार “ड” वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाचा आढावा दिनांक 11.06.2025 रोजी आयोजित बैठकीत घेतला. सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.21 दिनांक 11.03.2022 नुसार पालिका सदस्यांच्या निवडणूकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने अशी अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेची प्रभाग रचना राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्त यांच्या मान्यतेने करावयाची असल्याबाबत आयुक्त यांनी यावेळी सांगितले. तसेच सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.43, दिनांक 08...
Congress : शुक्रवारी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली

Congress : शुक्रवारी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारा विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवार दि.१३ रोजी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदीसह इतर मान्यवरांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारा बाबत सविस्तर विश्लेषण लेखाच्या माध्यमातून, लोकसभा विरोध पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमातून केले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारा विरोधात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. याच अनुषंगाने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या शुक्रवार दि...
Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

नांदेड, राजकीय
नांदेड/अर्धापुर। अर्धापूर तालुक्यात दिनांक नऊ रोजी मृग नक्षत्राच्या वादळी वाऱ्याने व पावसाने तालुक्यातील केळी व पपईच्या बागा उध्वस्त केल्या. तोंडाशी आलेला खास निसर्गाने अचानक हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अतोनात लाखो रुपयांचे नुकसान झाले. खासदार अशोकराव चव्हाण व या भागाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या पंचनामे करण्याची सूचना. अर्धापूर तालुक्यातील केळी राज्यासह भारतभर प्रसिद्ध असून अर्धापूर येथून जवळपास देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात केळीचा पुरवठा केला जातो. तसेच परदेशातही या भागातून केळी निर्यात केली जाते. या भागात केळीचे मोठ्या प्रमाणे पीक घेतले जाते. जवळपास एक वर्ष लहान लेकरासारखा सांभाळ केल्यानंतर केळीचा पीक हाती येतो. पावसाळा सुरू होताच केळीच्या बागा पण सुरू होतात कापणीस येतात. केळीला एप्रिल महिना व मे महिन्याचा उन्हाचा तीव्रता सहन होत नाही म्हणून शेतकरी खालील जमी...
Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नागरिकांचा आवाज खासदार डाॅ.अजित गोपछडे राज्य सभेत बुलंद करणार – डाॅ.हंसराज वैद्य

Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नागरिकांचा आवाज खासदार डाॅ.अजित गोपछडे राज्य सभेत बुलंद करणार – डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड, राजकीय
नांदेड l ज्येष्ठ नागरिक उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम नांदेडचे अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य, सचिव प्रभाकर कुंटूरकर, अध्यक्षा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ महिला विभाग व जिल्हा सरचिटणीस तथा सचिव भा.ज. पा. महिला मोर्चा डाॅ शितल ताई भालके यांनी खा.डाॅ.अजित गोपछडे व मराठवाडा संघटण मंत्री संजय कौडगे यांच्याशी ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह फेस्काॅमच्या प्रलंबित मागण्या संबंधी सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी दोघांचाही यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले. आवचित्य होते खासदार डाॅ.अजित गोपछडे व संजयभाऊ कौडगे यांच्या डाॅ.हंसराज वैद्य व डाॅ.शितल ताई भालके यांच्या राहात्या घरी दि. 8/6/2025 दिवशीच्या सदिच्छा भेटीचे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे दोघांनाही एक सविस्तर निवेदनही देण्यात आले. ज्येष्ठांबद्दलच्या फेस्काॅमच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली.तसेच येत्या स्थानिक स्...
Damage due to rain including storm : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळासह पावसामुळे केळी, ऊस, पपई बागायती शेतीचे नुकसान

Damage due to rain including storm : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळासह पावसामुळे केळी, ऊस, पपई बागायती शेतीचे नुकसान

कृषी, नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदार संघात दि. 09/06/2025 रोजी तुफान वारा वादळासह अवकाळी पावसामुळे झालेल्या केळी, ऊस, पपई यासह बागायती शेतीचे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. दि.09/06/2025 रोजी सायंकाळी हदगाव व हिमायतनगर तालुक्यांमध्ये अचानकपणे तुफान वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावस झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यात केळी, ऊस, पपई यासह बागायती असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात झाले. पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या केळीच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शासन स्तरावरून तातडीने मदतीची आवश्य...
error: Content is protected !!