नवीन नांदेड l नावामनपाचा मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत दोन कोटी पन्नास लक्ष रूपयांचा शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल अंतर्गत असलेल्या स्वामी समर्थ नगर ते असदवन रोड पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट कामांचा शुभारंभ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या पाठपुराव्या मुळे व दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,यांच्या प्रयत्नाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या उपस्थितीत 9 जुनं रोजी करण्यात आला.


सिडको परिसरातील शंकरराव चव्हाण मोढा प्रकल्प अंतर्गत मधील स्वामी समर्थ नगर ते असदवन रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचा कामामुळे मोढा प्रकल्पातील अनेक मालमत्ता धारकांना व असदवन वाशियांना यांच्या फायदा होणार आहे.

शुभारंभ प्रसंगी शहर प्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,शहर अभियंता सुमंत पाटील,उप अभियंता अरूण शिंदे,जगदीश सिंग महाजन ,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी,रवि थोरात जगदीश भुरे,प्रदीप लोणे, गंगाधर गिरडे,कदम गूतेदार फौजी यांच्या उपस्थितीत होती.
