HomeकृषीOpportunity for cotton growers : कापूस उत्पादकांसाठी दिलासादायक संधी; कॉटन श्रेडरसाठी महाडीबीटीवर...

Opportunity for cotton growers : कापूस उत्पादकांसाठी दिलासादायक संधी; कॉटन श्रेडरसाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू

नांदेड | केंद्र पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ अंतर्गत सन 2026-27 साठी कॉटन श्रेडर (Cotton Shredder) या घटकासाठी नांदेड जिल्ह्याला 114 यंत्रांचा तालुकानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे. इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

कापूस शेतीत यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या योजनेत प्रथमच कॉटन श्रेडरचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाने या योजनेस पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) च्या धर्तीवर तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल ₹75 हजार, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा कमाल ₹60 हजार इतके अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ (First Come, First Serve – FCFS) या तत्त्वावर केली जाणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कापूस उत्पादनात वाढ, पीक अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments