नांदेड l दि.९ सुमारे ३८ वर्षांपूर्वी एका वर्गात शिक्षण घेतलेल्या मित्रांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी सर्व जण स्थिरावले.. पण भेटीचा उन्माळा दाटून आला आणि जागतिक मैत्रीदिनी सर्व जण एकत्र येऊन नांदेड शहरात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले.


नांदेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन १९८६ ते १९८८ या कालावधीत पेंटर (जनरल) या ट्रेडमध्ये २० जण शिक्षण घेत होते.४ जणांनी वेगवेगळ्या कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडले.सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच लागले.काहीजण बजाज, टेल्को आधी कंपनीमध्ये तर काहीजण शिक्षक,कला शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिक म्हणून नोकरीला लागले.38 वर्षानंतर आपले मित्र कुठे, कुठे कार्यरत आहेत.

याचा शोध घेण्याची मोहीम वरिष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांनी गेल्या दोन महिन्यापासून राबविली.त्याकाळी मोबाईल,इंटरनेट, सोशल मीडिया ही यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे शोधणे खुप अवघड गोष्ट होती. आडनाव आणि गाव याचा मिलाप करीत परस्परांच्या सहकार्याने मित्रांची एक एक कडी जोडत १३ जणांचे जाळे विणल्या गेले. कुणी मुंबई, कुणी पुणे, छत्रपती संभाजी नगर येथे स्थायिक झालेले आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण झाली.

अनेक जण सेवानिवृत्त झालेले,कुणी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले.सर्वांनाच परस्परांच्या भेटीची ओढ लागली.जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून ८ जून रोजी सर्वजण नांदेड येथे एकत्र आले.जुन्या आठवणींना उजाळा देत परस्परांना आलिंगन देऊन स्नेहभाव व्यक्त केला.

पत्रकार प्रकाश कांबळे, सोमनाथ महाबळे, श्रीमती महामाया कदम, संभुराज सोनवणे, राजेंद्र पाटील,किशन दासरवाड,व्यंकट मोरडे, अनिल गालेवाड,रामकिशन चुबेवार,जळबा घारके,विठ्ठल पोतदार, प्रदिप पतंगे या सर्व मित्रांनी कौटुंबिक जीवनाची माहिती सांगत परस्परांच्या सुख,दुःखात यापुढे देखील धावून जाण्याचे अभिवचन परस्परांना दिले.श्रीमती महामाया कदम यांनी डायरी,पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.किशन दासरवाड या मित्राचा वाढदिवस देखील सर्वांनी जल्लोषात साजरा केला.
सदरील स्नेह मेळाव्यासाठी श्री गुरुगोबिंद सिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सूर्यवंशी,पेंटर (जनरल) चे निदेशक रघुनाथ बोडके, वरिष्ठ लिपिक लता ढाकरे यांनी बहुमोल सहकार्य केले.